Homeटॉप स्टोरीभाजपाचे मतदारसंघनिहाय निवडणूकप्रमुख...

भाजपाचे मतदारसंघनिहाय निवडणूकप्रमुख जाहीर!

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूकप्रमुखांची घोषणा केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. भाजपा-शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २००पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ‘’महाविजय अभियान २४’’चे प्रदेश संयोजक आ. श्रीकांत भारतीय, महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

भाजपाने नियुक्त केलेले निवडणूकप्रमुख भाजपाबरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूकप्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरू असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहोचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतो, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आ. राहुल कुल, पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ, मुंबई उत्तरसाठी आ. योगेश सागर, मावळसाठी आ. प्रशांत ठाकूर आदींची निवडणूकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content