Homeन्यूज ॲट अ ग्लांसविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात...

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यंदा फुलांऐवजी कापडी बुके

हातमागावर कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे. स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात. राज्य विधिमंडळाच्या नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने आकर्षक व पर्यावरणपूरक कापडाचे बुके तयार केले आहेत. एरव्ही विविध समारंभामध्ये फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे. त्याऐवजी कायम लक्षात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल, अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले कापडी आकर्षक बुके हातमाग महामंडळाने तयार केले आहेत. अधिवेशनासाठी येणाऱ्या अभ्यागतांच्या स्वागतासाठी हे बुके देण्यात येणार आहेत.

हातमागावरील विविध तयार कपड्यांना संपूर्ण देशात मागणी आहे. रेशीम साडयांपासून टॉवेल, चादर, रुमाल, सूती साडया आदी कापड स्वदेशी डिझाईनचा वापर करुन हातमागावर तयार करण्यात येते. यासाठी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार फॅशनचा अभ्यास करुन कलात्मक व कौशल्याचा वापर करुन पर्यावरणपूरक वस्त्रांची निर्मिती केली जाते. शासनाने हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे. बाजारपेठेसोबतच स्पर्धा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. कापडी बुके ही संकल्पना उमरेड रोडवरील हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरु करण्यात आली असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले.

नागपुरी साडी, कोसा, सिल्क आदी दर्जेदार कापड हातमागावर तयार करण्यात आलेल्या बुकेसोबत आकर्षक कापडी बॅग तयार करण्यात आली आहे. कापडी बुकेमध्ये नॅपकीन, रुमाल, टॉवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच हस्तकलेद्वारे निर्मित केलेल्या बकेटमध्ये विविध प्रकारच्या हातमाग कापडांचा समावेश असलेले व तेवढयाच आकर्षक वेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहेत. यासाठी हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरुन विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content