Homeकल्चर +चिरंजीवी फिल्म पर्सनॅलिटी...

चिरंजीवी फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर!

चिरंजीवी. होय, 2022चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येणार आहे.

गोव्यामध्ये काल  झालेल्या 53 व्या इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या दिमाखदार उद्घाटन समारंभात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही घोषणा केली. त्यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन व्यासपीठावर उपस्थित होते.

हा पुरस्कार म्हणजे, सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या या मेगास्टारने सिनेमा, लोकप्रिय संस्कृती आणि सामाजिकदृष्ट्‍या  महत्त्वाच्या  कलात्मक कामामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल देशाने दिलेला सन्मान आहे .  

चिरंजीवी एक प्रख्यात भारतीय अभिनेता, नर्तक, चित्रपट निर्माता, आवाजाच्या जगतातील कलाकार तसंच सेवाभावी  आणि राजकारणी अशी बहुआयामी ओळख असलेलं व्यक्तिमत्व. त्यांनी प्रामुख्यानं तेलगू सिनेमातांतून काम केलेलं असलं तरी, हिंदी, कन्नड आणि तमिळ भाषांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची कमाल दाखवली आहे.

आपल्या जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, त्यांनी 150हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

कलाकार म्हणून त्यांच्या प्रतिभेचा गौरव म्हणून त्यांना  आजवर असंख्य प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यात पद्मभूषण, या  भारताच्या तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारासह, रघुपती व्यंकय्या पुरस्कार या आंध्र प्रदेश राज्य सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराचा तसंच नंदी पुरस्कारासह इतर असंख्य पुरस्कारांचा समावेश आहे. चिरंजीवी यांनी 1978मध्ये ‘पुनाधिराल्लू’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

1982 साली आलेल्या ‘इंतलो रामय्या वीदिलों कृष्णय्या’ या चित्रपटात भूमिका साकारताना, त्यांनी केलेल्या अभिनयातून जनमानसाच्या भावनांचे प्रतिबिंबच उमटले होते.  त्यांचं भारावून टाकणारं नृत्यकौशल्य आणि हाणामारीच्या प्रसंगांमध्ये ताकदीचं दर्शन घडवणारी त्यांच्या कलाकारीनं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

 त्यांनी 1998मध्ये “द चिरंजीवी चॅरिटेबल फाऊंडेशन” या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून ते सेवाभावी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. आपल्या व्यक्तिमत्वातल्या या नानाविध पैलुंनीच चिरंजिवी यांना ‘मेगास्टार’ ही पदवी मिळवून दिली आहे.  

वहिदा रहमान, रजनीकांत, इलैयाराजा, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, अमिताभ बच्चन, सलीम खान, बिस्वजित चॅटर्जी, हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यासारख्या दिग्गज चित्रपटकर्मींना यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content