Homeबॅक पेजबेघरांकडे मुख्यमंत्री आणि...

बेघरांकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे!

मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांच्या हक्कांसाठी राज्यशासनाने विविध योजनांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. शासनाच्या योजनां यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यास उद्दिष्ट पूर्ण होईल आणि प्रश्न कायमस्वरुपी सुटतील, असे प्रतिपादन आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नुकतेच केले.

जागतिक बेघर दिवस निमित्ताने मुंबईतील पहचान संस्थेच्या पुढाकाराने वरळी येथे बेघरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष आणि राज्य निवारा सनियंत्रण समितीचे सदस्य ब्रिजेश आर्य यांनी याकरीता पुढाकार घेतला होता.

सततच्या पाठपुराव्यानंतर आता मुंबई महापालिकेने बेघरांसाठी प्रशिक्षण आणि निवारा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना हक्काची घरे मिळाल्यास प्रश्न मार्गी लागतील, असे गलगली यांनी सांगितले.

ब्रिजेश आर्य म्हणाले की, समस्या फार आहेत आणि आता सकारात्मक बदल दिसून येत आहेत. निवडणूक आयोग, कॅनरा बँक, तहसीलदार आणि शिधावाटप अधिकारी यांच्या सहकार्याने बेघरांना मदत मिळत आहे. 2011च्या लोकसंख्या गणनेनुसार मुंबईत 57, 416 इतके बेघर आहेत. मुंबईत 125 निवारा केंद्रांची आवश्यकता असून सध्या केवळ 25 निवारा केंद्रं आहेत.

यावेळी सुभाष रोकडे, रेखा खारवी, शांताबाई सोनटक्का, पूजा वाघरी, गीता खारवी, भारती भोजया, संजना, मंदा जोशी, सुनिता कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या एसआयपी स्वयंसेवकांपैकी मीनाक्षी बिपीन, बीनी कोचर, महक वाधवा, स्नेहा सायजी, रेचल, ऐमिनी मॅथ्यू, विश्वजीत ध्रुवशाह आदी उपस्थित होते.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content