Homeकल्चर +चंद सासें सर्वोत्कृष्ट...

चंद सासें सर्वोत्कृष्ट कौटुंबिक तर वारली आर्ट पर्यटन चित्रपट!

2021 या वर्षाचे 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाले. यात नॉन फिचर फिल्म प्रकारात, सर्वोत्कृष्ट कौटुंबिक मूल्य असलेला चित्रपट म्हणून, चंद्रकांत कुलकर्णी निर्मित, प्रतिमा जोशी दिग्दर्शित चंद सासें, या चित्रपटाला आणि पर्यटन, निर्यात, कलाकुसर आणि उद्योग याचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपटांसाठीचा पुरस्कार, हेमंत वर्मा दिग्दर्शित, वारली आर्ट, या चित्रपटाला घोषित झाला आहे.

पुरस्कारांच्या घोषणेपूर्वी, निवड समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली आणि पुरस्कारांसाठी निवड झालेल्यांची यादी सादर केली. पुरस्कारांसाठी दाखल प्रवेशिका काळजीपूर्वक तपासल्याबद्दल आणि सर्वोत्तम निवड केल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी निवड समितीचे आभार मानले. त्यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले की, प्रत्येक श्रेणीतील चित्रपटांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. मी विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज भारत हा चित्रपट निर्मिती करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. आपल्याकडे जगाचे कंटेंट हब (आशय केंद्र) बनण्याची क्षमता आहे. हा काळ आपला आहे. आज आपल्या चित्रपटाने जगात वेगळी ओळख मिळवली आहे, मग ते बाफ्टा (BAFTA) पुरस्कार असोत, की ऑस्कर पुरस्कार?

निवड समितीमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत चित्रपट निर्माते आणि चित्रपटकर्मीचा समावेश होता. फीचर फिल्म्स निवड समितीचे अध्यक्ष केतन मेहता, नॉन-फीचर फिल्म्स निवड समितीचे अध्यक्ष वसंत एस साई, सर्वोत्कृष्ट लेखन निवड समितीचे यतींद्र मिश्रा यांनी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा सेखर यांच्या उपस्थितीत पुरस्कारांची घोषणा केली.

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, तर सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म प्रकारात सृष्टी लाखेरा दिग्दर्शित एक था गाव, या चित्रपटाला पुरस्कार जाहीर  झाला आहे. द काश्मीर फाईल्सला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर RRRला परिपूर्ण मनोरंजन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अल्लू अर्जुनला पुष्पा (द राइज पार्ट I) या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे, तर आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी आणि क्रिती सॅनॉन, मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या संयुक्त विजेत्या ठरल्या आहेत. पंकज त्रिपाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर पल्लवी जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार एकदा काय झालं, या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला जाहीर झाला आहे. निखील महाजन दिग्दर्शित गोदावरी या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

चित्रपट विषयक सर्वोत्तम पुस्तकासाठीचा पुरस्कार रूपा पब्लिकेशनच्या राजीव विजयकर लिखित  MUSIC BY LAXMIKANT PYARELAL : THE INCREDIBLY MELODIOUS JOURNEY या इंग्रजी पुस्तकाला घोषित झाला आहे.

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content