Homeपब्लिक फिगरतंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योग...

तंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योग संक्रमणाचे आव्हान अजूनही कायम!

2019मध्ये LeadITचा प्रारंभ झाल्यापासून आंतरराष्ट्रीय अजेंड्यावर उद्योग संक्रमणाने मोठी झेप घेतल्यामुळे जागतिक औद्योगिक परिदृश्यात लक्षणीय बदल झाला. मात्र असे असले तरीही, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि वित्त पुरवठा क्षेत्रातील संक्रमणाच्या खऱ्या आव्हानांना अद्याप सामोरे जाणे बाकी आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल सांगितले.

दुबईतील COP28 शिखर परिषदेत न्याय्य आणि समान उद्योग संक्रमणासाठी भागीदारी, या विषयावरील कार्यक्रमात बोलताना भूपेंद्र यादव यांनी या विषयावर सकारात्मक मत नोंदवले. हे आव्हान सहकार्यात्मक आंतरराष्ट्रीय यंत्रणांद्वारे हाताळले जाऊ शकते. या यंत्रणेने बौद्धिक संपदा अधिकार सारखे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यामुळे विकसित देशांकडून विकसनशील देशांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

उद्योग संक्रमण व्यासपीठावरील भारत-स्वीडन संयुक्त घोषणापत्र ही केवळ दोन राष्ट्रांमधील भागीदारी नसून शाश्वत भविष्यासाठी असलेली आघाडी आहे, असे स्वीडनसोबतच्या सहकार्याबाबत बोलताना ते म्हणाले. हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्याच्या आणि उद्योगांची पर्यावरणाशी सुसंगती साधून भरभराट होत असलेल्या जगाला आकार देण्याच्या आमच्या सामूहिक संकल्पाचा हा दाखला असल्याचे त्यांनी सांगितले.

भूपेंद्र यादव यांनी भविष्यातील उद्योगाला आकार देण्यासाठी नवोन्मेष, सहयोग आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी भागधारकांना एकत्र काम करण्याचे आवाहन करताना यादव म्हणाले की, एक असे उद्योगजगत हवे जे शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी समृद्धी आणणारे असेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content