मुंबई स्पेशल

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले. मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला. भारतमाता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तीपर गीत...

विधिमंडळाचे अधिवेशन ठरल्याप्रमाणे...

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत कामकाज सुरू राहणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आज मुंबईत विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार...

तुळशीपाठोपाठ विहार व...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आज मध्यरात्री १२ वाजून...

मुंबईतल्या 269 शाळा...

तांत्रिकदृष्ट्या ज्या 269 शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत त्या अधिकृत करण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता दिली जाईल, असे...

मुंबई महापालिकेच्या ‘जी...

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक समाज माध्यमांसह विविध संपर्क व संवाद साधने उपलब्ध करुन दिली आहेत....

धारावी पोलीसठाण्यात महिला...

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीसठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील...

आता भविष्य निर्वाह...

भविष्य निर्वाह निधीचे २०२२-२३ चे वार्षिक लेखा विवरण सेवार्थच्या https://sevaarth.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष प्रत (हार्ड कॉपी) देणे थांबवल्याचे महालेखाकार कार्यालयाने...

रिक्षा-टॅक्सी चालकाने भाडे...

शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे...

मुंबईकरांसाठी खुशखबर! तुळशी...

मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या तलावांपैकी एक तुळशी तलाव काल मध्यरांत्रीनंतर म्हणजेच आज पहाटे ओसंडून वाहू लागला. यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहणारा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हा...

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाला...

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी यादृष्टीने यंदाचा...
Skip to content