भारतीय नौदलाने काल विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका औपचारिक समारंभात आयएनएस आन्द्रोत, हे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आपल्या सेवेत दाखल करून घेतले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अॅडमिरल राजेश पेंढारकर होते. यावेळी वरिष्ठ अधिकारी, मे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयएनएस आन्द्रोत हे 80%पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर असलेले एक झळाळते प्रतीक आहे. 77 मीटर लांबी आणि सुमारे 1500 टन वजन वाहून नेणारे, आयएनएस आन्द्रोत विशेषतः किनारी आणि उथळ पाण्यात पाणबुडीविरोधी मोहिमांसाठी खास डिझाइन केलेले आहे. अत्याधुनिक पाणबुडी शिकारी असलेले...
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी आज सत्ताधारी तसेच विरोधकांकडून फक्त सहाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता...
भारतीय लष्कराने 13 फेब्रुवारी 24 ते 22 मार्च 24 या कालावधीत अग्निवीर आणि नियमित केडरच्या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील...
चालू आर्थिक वर्षातील चौथी तिमाही संपण्याच्या उंबरठ्यावर असताना, एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म सरकारी ई मार्केटप्लेसने 3 लाख कोटी रुपयांचे एकूण व्यापारी मूल्य (जीएमव्ही) नोंदवले आहे, जे मागील...
सध्या 61 देश आणि पाच बहुपक्षीय संस्थांसोबत अंतराळ सहकार्यसंबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी...
QX Lab AI ही एक अग्रगण्य आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस (AGI) कंपनी असून, कंपनीने नुकतेच Ask QX सादर केले आहे. हे Ask QX भारतीय जनतेसाठी AI अधिक सुलभ बनवण्यासाठी जगातील पहिले हायब्रिड जनरेटिव्ह AI प्लॅटफॉर्म आहे. नोड-आधारित आर्किटेक्चर असलेले हे पहिले असे अॅप आहे. Ask QX 100+ भाषांमध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी 12 भारतीय आहेत. देशभरातील आणि त्यापलीकडे असलेल्या भारतीयांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत दररोज GenAIशी अखंडपणे गुंतवून ठेवणे हा यामागचा उद्देश आहे.
वेब प्लॅटफॉर्म आणि ॲप उपलब्ध असलेल्या १२ भारतीय भाषांमध्ये हिंदी, बंगाली, तेलगू, मराठी, तमिळ,उर्दू, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी आणि आसामी यांचा समावेश आहे. इंग्रजी व्यतिरिक्त Ask QX इतर जागतिक भाषांमध्ये जसे की अरबी, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, जर्मन, इटालियन, कोरियन, पोर्तुगीज, रशियन आणि सिंहलीमध्येदेखील उपलब्ध आहे. हा QX Lab AIच्या भविष्यवादी दृष्टीचा आणि भारतातील आणि मध्य पूर्व आणि श्रीलंकासारख्या बाजारपेठांमधील समृद्ध भाषिक टेपेस्ट्रीच्या सखोल आकलनाचा दाखला आहे.
2024च्या पहिल्या तिमाहीत मजकूर आणि ऑडिओ फॉरमॅटची त्वरित उपलब्धता आणि इमेज आणि ...
केंद्र सरकारने, काल 'स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)' या संघटनेला बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा (युएपीए) 1967च्या कलम 3(1) अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी 'बेकायदेशीर संघटना'...
राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी परिस्थिती...
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि ओमानचे परिवहन, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला....