Homeएनसर्कलअबुधाबीतल्या थ्रीएआय होल्डिंगला...

अबुधाबीतल्या थ्रीएआय होल्डिंगला मिळणार ‘हनुमान’ची मालकी

अबुधाबीमधल्या एआय गुंतवणुकीतली जागतिक कंपनी थ्रीएआय होल्डिंग लिमिटेडने एसएमएल इंडिया कंपनीसोबत नुकतीच धोरणात्मक भागीदारी केली आहे. यामुळे त्यांना संयुक्तपणे भारतातील सर्वात मोठ्या, स्वस्त आणि सुलभ बहुभाषिक जेनेआय प्लॅटफॉर्म ‘हनुमान’ची मालकी मिळू शकते.

थ्रीएआय होल्डिंग प्रामुख्याने एआय पायाभूत सुविधा आणि एआय पायाभूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. सीता महालक्ष्मी हेल्थकेअर (एसएमएल)ने यावर्षी फेब्रुवारीमध्ये नॅसकॉमच्या एनटीएलएफ टेकएड परिषदेत ‘हनुमान’ची सर्वप्रथम ओळख करून दिली. थ्रीएआय होल्डिंगचे स्वदेशी मालकीचे पेटंट प्रलंबित असलेले ओमेगा जनरेटिव्ह एआय हे ‘हनुमान’ला अधिक व्यापक आणि शक्तिशाली बनवेल. 1 मे 2024ला हे लॉन्च होणार आहे.

थ्रीएआय होल्डिंग आणि एसएमएल यांच्यात नव्याने झालेल्या धोरणात्मक भागीदारीनुसार, हनुमान लाँच झाल्याच्या दिवसापासून पहिल्या वर्षात 22 भारतीय भाषांमधील 200 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. भारताच्या 142 कोटी लोकसंख्येमध्ये 80% लोक इंग्रजी बोलू शकत नाहीत. अशा सर्वांना हनुमान सक्षम करेल. तसेच जे केवळ स्थानिक भाषा बोलू शकतात, अशा सगळ्यांना ते फायदेशीर असेल. 50% भागीदारीसह हे दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त मालकीचे असेल.

हनुमान ग्राहकांना मजकूर, आवाज, प्रतिमा आणि कोड यासह बहुविध आणि बहुभाषिक क्षमता प्रदान करेल. या संयुक्त भागीदारीद्वारे, भारतासाठी भारतात तयार केलेले हनुमान हे मूलभूत मॉडेल, जगासाठी एक एआय इकोसिस्टम तयार करेल. ते नवोदित जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म्सना त्यांचे प्रयोग सादर करण्यास सक्षम करेल. जनरेटिव्ह एआय स्पेसची भरभराट व्हावी आणि भारताने या स्पेसचे नेतृत्त्व करावे यासाठी हे स्टार्टअप्सना प्लॅटफॉर्म देईल तसेच नॅसकॉमसोबत त्यांना इनक्यूबेट करेल. त्याच्या बहुभाषिक क्षमतांसह आणि नॅसकॉमच्या सोबतीने ग्राहक आणि कॉर्पोरेशन या दोघांचेही भले करण्याचे हनुमानचे उद्दिष्ट आहे.

एसएमएल इंडिया आणि थ्रीएआय होल्डिंगचा ‘एआय फॉर ऑल’ या मूलभूत तत्त्वावर विश्वास आहे. या दोन्ही कंपन्यांनी तयार केलेला सामंजस्य करार (एमओयू) हा ‘हनुमान’ या ब्रँड अंतर्गत भारतीय लोकांसाठी जनरेटिव्ह एआय स्पेस सगळ्यांना उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. हे सगळे अशा महत्त्वाच्या वेळी घडत आहे, ज्यावेळी जागतिक जनरेटिव्ह एआय कंपन्या भारताकडे डोळे लावून बसले आहेत. याच प्रयत्नांमुळे एआय उत्पादनांच्या विकासासाठी आणि वापरासाठी भारत ही एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ बनली आहे.

या भागीदारीबद्दल बोलताना, थ्रीएआय होल्डिंगचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन प्रसाद म्हणाले की, लोकांची सोय आणि सामाजिक विकासासाठी आम्ही एआयची मदत घेऊ इच्छितो. या हनुमानाला शक्ती देण्यासाठी एसएमएलसोबत केलेली ही भागीदारी हे आमचे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. भारतीय लोकांसाठी एआय सर्वसमावेशक व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जे केवळ स्थानिक भाषा बोलू शकतात, अशांसाठी त्यांच्या भाषेत, त्यांना कळेल असे संदेश देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. इंडिया आणि भारत यांच्यातील दरी कमी करण्याच्या दृष्टीने आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. एआयला सर्वसमावेशक बनवण्यासोबतच प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या भाषेत याची माहिती मिळावी तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात याचा प्रसार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. विष्णू वर्धन, सह-संस्थापक आणि सीईओ, एसएमएल इंडिया म्हणाले की, ‘हनुमान’चा अधिक प्रगत अवतार सादर करण्यासाठी आम्ही थ्रीएआय होल्डिंगसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहोत. यामुळे भारतीयांचा तंत्रज्ञानाशी सुरू असलेला संवाद बदलेल. या धोरणात्मक भागीदारीच्या मदतीने, 12 महिन्यांत 22 भारतीय भाषांमधील 200 दशलक्ष वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. थ्रीएआय होल्डिंगची मालकी, पेटंट-प्रलंबित ओमेगा जनरेटिव्ह एआय आम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल, जे यापूर्वी कधीही शक्य नव्हते. एआय सकारात्मकतेने स्वीकारणे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात वापर यामुळे भारत या क्षेत्रात अग्रेसर होईल. तसेच याचा देशातील बहुसंख्य लोकांना फायदा होत होईल. आरोग्यसेवा, कायदेशीर सेवा आणि शिक्षण यासारख्या उद्योगांमध्ये एआयचा वापर करून आम्ही आमची भारताप्रती आमची बांधिलकी अधोरेखित करते.

एमआयटीचे डॉ. विष्णुवर्धन यांनी IITB, MIT, OSU, UIUC आणि भारतातील आणि जगभरातील इतर नामांकित शैक्षणिक संस्थांसोबत अनेक संशोधन प्रकल्प केले आहेत.

अबुधाबी स्थित गुंतवणूक फर्म थ्रीएआय होल्डिंग लिमिटेडचे प्रथितयश उद्योजक अर्जुन प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली, 665 अब्ज पॅरामीटर्स आणि 20 ट्रिलियन टोकन्ससह ओमेगाची प्रगत आवृत्ती आणणार आहे. जागतिक जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्मशी याची स्पर्धा असेल. युनायटेड स्टेट्समधील तिसरी पिढी सांभाळत असलेल्या पटेल फॅमिली ऑफिसचा थ्रीएआयला भक्कम पाठिंबा आहे. थ्रीएआय होल्डिंग लिमिटेडने अलीकडेच Ask QX लाँच केले, जे 100+ जागतिक भाषांमध्ये आणि 372 अब्ज पॅरामीटर्ससह 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध एआय प्लॅटफॉर्म आहे. लॉन्च झाल्याच्या पहिल्या दोनच महिन्यांत त्यांनी 14 दशलक्षांहून अधिक युझर्स मिळवले आहेत.

भारतीय संस्थापकांनी स्थापन केलेली, एसएमएल इंडिया ही भारताची अग्रणी आणि बहुभाषिक एलएलएमएस विकसित करणारी जागतिक स्तरावरील पहिली संस्था आहे. भारतातील पहिले पूर्ण-स्टॅक, एंटरप्राइझ-रेडी जेन एआय मॉडेल्स तयार करणे, जेन एआय उद्योगात एक नवीन बेंचमार्क स्थापित करणे हे त्याचे महत्त्वाचे काम आहे.

या संयुक्त उपक्रमामुळे तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचे नवीन युग सुरू झाले आहे. डॉ. विष्णू वर्धन, एमआयटीचे माजी विद्यार्थी आणि अबुधाबी येथील अर्जुन प्रसाद हे दोघेही याचे उत्तम उदाहरण आहे. हा उपक्रम अत्यंत आश्वासक रिव्हर्स ब्रेन ड्रेन आणि देशामध्ये नवीन टॅलेंट शोधून त्यांना सेटल करणे हे भारताला तंत्रज्ञानात निश्चितच आघाडीवर नेईल. देशासाठी ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची क्षमता जनरेटिव्ह एआय मधून अनलॉक करण्यासाठी हे भक्कम पाऊल असेल, असा या दोघांनाही ठाम विश्वास आहे.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content