जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला आहे. बंगाल व तामिळनाडूच्या निवडणुकांआधी एप्रिल २०२६मध्ये पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजकीय रणनीतीनुसार संसदेचे विशेष अधिवेशन घेतले गेले. दोन दिवसांच्या या अधिवेशनात तीन घटनादुरुस्ती विधेयके मांडली गेली होती. पहिले होते घटनेच्या ८१व्या कलमात दुरुस्ती सुचवणारे १३१वे घटनादुरुस्ती विधेयक. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३वरून वाढवून ८१५ ते ८५०पर्यंत नेणे...
काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड पण भीषण हल्ल्यानंतर सध्या भारत-पाकिस्तानात युद्धसदृष्य तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील भारताची आजची प्रतिमा समजून...
आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या विश्चात भारताची खरी ओळख करुन देणारे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ८४ वर्षीय केरळच्या सनी थॉमस यांनी काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला....
पैशाचा योग्य वापर तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड...
क्रीडाविश्वात बऱ्याचदा विविध खेळांच्या नवनव्या स्पर्धांचे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असते. सुरुवातीला या स्पर्धांबाबत आयोजकांचा उत्साह दांडगा असतो. त्यामुळे काही काळ...
पाऊणशे वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतरही एखाद्या देशाला आपल्या अस्तित्त्वाच्या अर्थाचा प्रश्न पडावा का? पण, पाकिस्तानला तो पडतोय. 'पाकिस्तान का मतलब क्या?' हा प्रश्न आजही तेथे...
झेब्बुन्निसा! औरंगजेबची मोठी आणि सर्वात लाडकी मुलगी! औरंगजेब जो अतिशय निष्ठुर, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा, धर्मांध! तितकाच हिंसक आणि कोणावरही विश्वास न ठेवणारा पातशहा! आपल्या...
संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच...
'जिथे सागरा धरणी मिळते..
तिथे तुझी मी वाट पाहाते...!'
अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला...