संघकामाचा व्यापक इतिहास समजून घेताना हे पुस्तक वाचणे अनिवार्य ठरते. संघ स्थापनेपासून ते २०२५पर्यंतच्या सर्व तपशीलवार घडामोडी या पुस्तकात वाचायला मळतात. पुस्तकाच्या अनुक्रमणिकेत पाहिले प्रकरण संघ कार्याचा प्रारंभ: विजयादशमी 25 सप्टेंबर 1925 नागपूर, हे असून शेवटचे प्रकरण क्रमांक ७०: शताब्दी वर्षातील संघाची कार्य योजना हे आहे. 70 प्रकरणांमध्ये संघ आणि संघ विचाराने प्रेरित संघटनांचा आढावा घेतला गेला आहे. अगदी 370व्या कलमापर्यंत यात लिहिलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली संघटना आज सर्व जगामध्ये चर्चेचा विषय झाली आहे. १०० वर्षांत सातत्याने या संघटनेचा विस्तार होत गेला. आज सुमारे...
मुंबईच्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी आणि उत्कर्ष व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महिला व पुरुष, ज्युनियर आणि...
अमरावती शहरामध्ये एका दुचाकीने जाणाऱ्या तीन युवकांनी रस्त्याने जाणाऱ्या तब्बल जवळपास ३० ते ३५ गाड्या फोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
महाराष्ट्राचे पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभागांतर्गत असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती. ती तफावत आता दूर...
कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्धापनदिनानिमित्त गोवा टपाल विभागाने शुक्रवारी पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) आणि टपाल सेवा...
पेटीएमने आर्थिक वर्ष २०२४-२०२५च्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे, ज्यामधून कंपनीच्या विविध घटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्या कार्यसंचालन महसूलासह...
मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतल्या महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम...
मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत पुण्याच्या रोहित मिरजकरने...
भारतात पर्यटन क्षेत्र वेगाने वृद्धींगत होत आहे. इतकेच नव्हे तर, देशातील आर्थिक वृद्धी व गुंतवणूक संधींना पर्यटन उद्योगामुळे प्रचंड चालना मिळत आहे. भारतातील समृद्ध संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. सरकारी उपक्रम, तंत्रज्ञानातील प्रगती आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमधील बदल यामुळे पर्यटन उद्योगक्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येत असून, त्यामुळे या उद्योगाकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे.
२०१९मध्ये प्रवास आणि पर्यटनावर १४० बिलियन डॉलर्स खर्च केले गेले होते. २०३० सालापर्यंत ही रक्कम ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट शहरे विकसित करणे आणि वाहतुकीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासारख्या पर्यटनाच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे या वाढीला चालना मिळत आहे.
टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट्स विभागाच्या प्रमुख शेली गंग सांगतात की, मूलभूत गरजांव्यतिरिक्त इतरत्र खर्च करण्यायोग्य उत्पन्नात होत असलेली वाढ आणि मध्यमवर्गीयांची वाढती लोकसंख्या यामुळे प्रवास व फुरसतीच्या वेळेवर खर्च करणाऱ्या भारतीयांची संख्यादेखील वाढत आहे. अनुभव घेण्यासाठी प्रवास करणाऱ्या मिलेनियल्सच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या ट्रेंडला अजून जास्त चालना मिळत आहे. भारतात एकूण पर्यटनापैकी ९९% देशांतर्गत पर्यटन आहे.
टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकताच देशातील पहिला 'टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड' आणला आणि गुंतवणूकदारांना भारतातील वेगाने वृद्धींगत होत असलेल्या प्रवास, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करवून दिली. हा फंड देशांतर्गत पर्यटनाशी संबंधित आहे, ज्याची देशातील एकूण पर्यटनातील हिस्सेदारी ९९% आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या तसेच भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या त्यांच्या मानाने खूपच कमी आहे.
खूप मोठ्या लोकसंख्येची आर्थिक क्षमता वाढत असणे ही पर्यटन क्षेत्राच्या वृद्धीसाठी एक लक्षणीय संधी आहे. बजेटमध्ये सहज बसतील, भरपूर अनुभव मिळवून देतील अशी आरामदायी ठिकाणे, थेट विमानसेवेची आणि शिथिल व्हिजा नियमांची सुविधा यांचा भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. भारतातील समृद्ध संस्कृती व परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे आणि वैविध्यपूर्ण निसर्गरम्य दृश्ये यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक आकर्षित होतात. जादुई हिमालयापासून मनमोहक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, डोळे दिपवून टाकणाऱ्या सणांपासून ते जगप्रसिद्ध स्मारकांपर्यंत अनेक वेगवेगळी आकर्षणे भारतात आहेत. भारतातील विविधता भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते, पर्यटन ...