Homeकल्चर +मुंबई उच्च न्यायालयाची...

मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आजपासून पर्यटकांसाठी खुली!

महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटनेच्या सहकार्याने ही इमारत आजपासून पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असून वारसा प्रशंसकांसाठी ती एक पर्वणी ठरणार आहे.

मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १४ ऑगस्ट १८६२ रोजी या न्यायालयाची स्थापना करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीचे काम एप्रिल १८७१मध्ये सुरू झाले आणि नोव्हेंबर १८७८मध्ये पूर्ण झाले. १९व्या शतकात ब्रिटिशांनी नेत्रदीपक आणि लक्षवेधी अशा गॉथिक पुनरुज्जीवन शैलीमध्ये ही इमारत साकारली होती. ही इमारत व्हिक्टोरियन आणि आर्ट डेकोएन्सेम्बल ऑफ बॉम्बेचा भाग आहे. जी २०१८मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जोडली गेली.

न्यायालय

२०१५मध्ये उद्घाटन झालेल्या इमारतीचे मुख्य आकर्षण असलेल्या संग्रहालयामध्ये आंतरिक रचना न्यायालयाच्या खोलीप्रमाणे आहे. ही जागा जुनी कायदेशीर रोल, वकिलांची पोर्ट्रेट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एका कोपऱ्यात असलेल्या मॉडेलसह तयार केली गेली आहे. १८९०च्या दशकातील कायद्याच्या अभ्यासासाठी महात्मा गांधी यांचा अर्ज आणि वल्लभभाई पटेल यांचे प्रमाणपत्र आणि पदवीसह त्यांचे १८९१चे प्रमाणपत्रदेखील तेथे प्रदर्शित केले गेले आहे.

पर्यटक आता शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी २पर्यंत या ठिकाणी भेट देऊ शकतील आणि प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी १ तास असेल. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये एकूण ३ हेरिटेज वॉक आयोजित केले जातील. देशातल्या पर्यटकांसाठी या हेरिटेज वॉकचे शुल्क प्रत्येकी नाममात्र १०० रूपये (अधिक कर, लागू असल्यास) तर विदेशी नागरिकांसाठी प्रत्येकी २०० रूपये (अधिक कर, लागू असल्यास) आकारले जातील. पर्यटकांनी bookmyshow.com वर तिकीट बुक करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या की, उच्च न्यायालयाचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तुकला याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यटक मार्गदर्शक संघटनेचे अध्यक्ष जेरू भरुचा म्हणाल्या की, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तींनी या ठिकाणी कामकाज केले आहे आणि पर्यटकांना अभिमान वाटला पाहिजे की त्यांना या सुंदर वास्तूमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळत आहे. आम्ही टूर मार्गदर्शकांची व्यवस्था केली आहे. ते पर्यटकांना हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये मार्गदर्शन करतील.

हेरिटेज वॉक गेट क्रमांक ४पासून सुरू होईल, जिथून त्यांना न्यायाधीश ग्रंथालय, सेंट्रल कोर्ट हॉल क्रमांक ४६, न्यायमूर्ती एम सी छागला (मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश) आणि संग्रहालय येथे नेले जाईल. जजेस पोर्च येथे हा वॉक संपेल. टूर गाईडद्वारे इमारतीच्या वास्तुकलेबद्दल सर्व माहितीदेखील दिली जाईल आणि पर्यटकांना निवडक ठिकाणी छायाचित्र घेण्याची मुभा असेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content