Homeपब्लिक फिगररणरणत्या उन्हात मुख्यमंत्री...

रणरणत्या उन्हात मुख्यमंत्री शिंदेंची बाईक रॅली!

रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. या प्रचारफेरीत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोटारसायकल चालवत राजू पारवेंच्या विजयासाठी मतदारांना साद घातली. या बाईक रॅलीमुळे उमरेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. याच मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दोन प्रचार सभा घेतल्या होत्या.

विदर्भातील कडक उन्हाची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी आज रोड शो केला. या बाईक रॅलीत महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. रामटेकला शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

शिंदे

देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, हे आपल्याला ठरवायचे आहे. येत्या १९ एप्रिलला धनुष्यबाणाचे बटन दाबून राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जो रामाचा नाही, तो कामाचा नाही असे सांगत दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करायचे आहे, असे ते म्हणाले.

मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकडे झेंडा आणि अजेंडा नाही तर ते कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झालाय. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय. प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणावर बटन दाबून राजू पारवेला संसदेत पाठवयाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content