Homeन्यूज अँड व्ह्यूजमहायुती असो वा...

महायुती असो वा मविआ, चिपळूण मात्र विकासापासून दूरच

सध्या राज्यात सर्वत्र जिल्हापरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे पडघम जोरशोरसे वाजत आहेत. सत्तारूढ महायुती व विरोधक असलेली महाविकास आघाडी समोरासमोर उभे ठाकले आहेत. काही कामानिमित्त चिपळूण, गुहागर व दाभोळ परिसरात जाण्याचा योग आला. जी स्थिती राज्यातील महापालिकांची आहे त्यापेक्षा कितीतरीपट गंभीर स्तिती तालुका पातळीवर नागरी सुविधांबाबत पाहवयास मिळाली. गेली सुमारे दहा वर्षे चिपळूण नगरपरिषद अस्तित्त्वातच नव्हती तरी प्रशासन कार्यरत होते. लोकप्रतिनिधी नसताना प्रशासन काय लायकीचे काम करते हे गेली काही वर्षे चिपळूणची जनता अनुभवत असल्याचे अनेकांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांची तर दुरवस्था आहेच, पण नगरपरिषदेने स्वतः बांधलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील रस्त्यांचीही धुळधाण झाली आहे. सांस्कृतिक केंद्र प्रांगणातील रस्ता तर केवळ केविलवाणाच दिसत आहे. खरंतर हा रस्ता नाहीच, ओबडधोबड खडीचा कुठल्यातरी दूरवर असलेल्या दुर्गम गावातील रस्त्यासारखा हा दिसत आहें. हे प्रांगण गेले दहा-बारा वर्षे याच स्थितीत असल्याची संतापजनक माहिती येथील नागरिकांनी सांगितली. यापेक्षाही संतापजनक गोष्ट म्हणजे या प्रांगणाशेजारीच आज संध्याकाळी महायुतीचे ज्येष्ठ नेते चिपळूण शहराच्या विकासाच्या ‘आणभाका’ घेणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत असूनही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यातील रस्त्यांची जर दुर्दशा दिसत असेल तर ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत विचारच करायला नको!

Continue reading

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...
Skip to content