Homeन्यूज ॲट अ ग्लांसअगरबत्तीत कीटकनाशके व...

अगरबत्तीत कीटकनाशके व कृत्रिम सुगंधी वस्तूंच्या वापराला बंदी

अगरबत्तीमध्ये काही कीटकनाशक रसायने आणि कृत्रिम सुगंधी पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मानवी आरोग्यासाठी, घरातील हवेच्या गुणवत्तेसाठी आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरू शकतील, अशी ही किटकनाशके आणइ कृत्रिम सुगंधी पदार्थ आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल अगरबत्तीसाठी बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरोद्वारे विकसित करण्यात आलेले, भारतीय मानक ‘आयएस 19412:2025 – अगरबत्ती’, तपशीलासह जारी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात हे मानक प्रकाशित करण्यात आले. या मानकांमध्ये अगरबत्तीत वापरण्यासाठी प्रतिबंधित पदार्थांची यादी नमूद करण्यात आली आहे.

नवीन अधिसूचित मानकांमध्ये ग्राहकांची सुरक्षितता, घरातील हवेची गुणवत्ता, पर्यावरणीय शाश्वतता आणि नियामक अनुपालन  तसेच जागतिक स्तरावर काही सुगंधी संयुगे आणि रसायनांवर असलेले निर्बंध लक्षात घेण्यात आले आहेत. हे मानक अगरबत्तीचे यंत्रनिर्मित, हाताने बनवलेल्या आणि पारंपरिक मसाला अगरबत्ती, असे वर्गीकरण करते. ग्राहकांसाठी सुरक्षित उत्पादने आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अगरबत्तीसाठी वापरलेला कच्चा माल, त्याची ज्वलन गुणवत्ता, सुगंध कार्यक्षमता आणि रासायनिक मापदंड याची आवश्यकताही हे मानक नमूद करते. या मानकांचे पालन करणारी उत्पादने बीआयएस मानक चिन्ह धारण करण्यासाठी पात्र असतील. यामुळे ग्राहकांना विचारपूर्वक तसेच माहितीपूर्ण निवड करता येईल. IS 19412:2025 च्या अधिसूचनेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, नैतिक आणि शाश्वत उत्पादन पद्धतींना चालना मिळेल, पारंपरिक उपजीविकेचे संरक्षण होईल आणि भारतीय अगरबत्ती उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेत प्रवेश वाढेल अशी अपेक्षा आहे.

भारत हा अगरबत्तीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार आहे. या उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 8,000 कोटी रुपये असून, 150 हून अधिक देशांमध्ये सुमारे 1,200 कोटी रुपयांची निर्यात होते. हे क्षेत्र ग्रामीण आणि निमशहरी भागात, विशेषतः कारागीर, एमएसएमई आणि सूक्ष्म उद्योजकांच्या मोठ्या परिसंस्थेला समर्थन देते आणि विशेषतः महिलांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देते. अगरबत्ती भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा अविभाज्य भाग आहे व घरे, प्रार्थनास्थळे, ध्यान केंद्रे आणि स्वास्थ्य केंद्रांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. योग, ध्यान, अरोमाथेरपी आणि सर्वांगीण स्वास्थ्य यामध्ये जागतिक स्तरावर वाढत्या रूचीमुळे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अगरबत्ती उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content