Homeब्लॅक अँड व्हाईटगुरांची घुसखोरी रोखण्यासाठी...

गुरांची घुसखोरी रोखण्यासाठी महामार्गांलगत बाहुबली कुंपण!

गुरांनी रस्ते ओलांडण्यामुळे मानवी जीवितहानी होणारे धोकादायक अपघात टाळण्यासाठी, गुरांना रस्ते ओलांडण्यापासून रोखण्यासाठी भारतातील महामार्गांलगत बाहुबली गुरे प्रतिबंधक कुंपण घालण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी विविध ट्वीट्सच्या मालिकेतून सांगितले आहे.

हे कुंपण 1.20 मीटर उंच असेल आणि एक सर्वसमावेशक उपाय म्हणून महामार्ग-30 च्या सेक्शन 23 वर घालण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी एक सादरीकरण म्हणून हे कुंपण काम करेल, असे ते म्हणाले.

हे गुरे प्रतिबंधक कुंपण बांबूपासून बनवलेले असून अतिशय प्रभावी आणि पर्यावरणस्नेही उपाय आहे, असे त्यांनी सांगितले. या कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूंवर क्रियोसोट तेलाची प्रक्रिया केली जाते आणि त्यावर एचडीपीईचा थर दिला जातो ज्यामुळे पोलादाच्या ऐवजी एक भक्कम पर्याय म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. या कुंपणाला प्रथम श्रेणीचे अग्नी मानांकन असून, ते सुरक्षा सुनिश्चित करणारे आणि आत्मनिर्भर भारताला अनुसरून आहे. यामुळे सर्व महामार्ग शाश्वत बनतील आणि वन्यजीव आणि गुरांची हानी कमी होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content