Homeकल्चर +आयुष्मान खुराना वाय...

आयुष्मान खुराना वाय वाय इंडियाचा ब्रँड अम्बॅसॅडर!

सीजी कॉर्प ग्लोबलचा एफएमसीजी विभाग सीजी फूड्सच्या मालकीचा, अतिशय लोकप्रिय नूडल्स ब्रँड वाय वायने (WAI WAI) आपल्या ब्रँड अम्बॅसॅडरपदी बॉलिवूड सुपरस्टार आयुष्मान खुरानाची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

तब्बल २५ वर्षांची समृद्ध परंपरा आणि युवकांमधील प्रचंड लोकप्रियता यांचे बळ असलेला वाय वाय हा ब्रँड आता युवापिढीचे प्रतिनिधित्व करणारे अस्सल व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आयुष्मान खुराना यांच्याशी सहयोग करून आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. ‘वाय वाय वाला टेस्ट’ या संकल्पना आणि टॅगलाईनसह, वाय वायचा अनोखा स्वाद आणि सीझनिंग यांचा आनंद साजरा करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांनी सांगितले, वाय वाय सारख्या युवकांच्या अतिशय पसंतीच्या ब्रँडसोबत सहयोग करताना मला अतिशय आनंद होत आहे. अतिशय प्रभावी आणि वैविध्यपूर्ण उत्पादन श्रेणी हे या ब्रँडचे अनोखे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक व्यक्तीचा आवडीचा स्वाद, निरनिराळी क्षेत्रे आणि प्राथमिकता यांना अनुरूप अशा या नूडल्स सादर करून हा ब्रँड आपल्या लोकप्रियतेला साजेशी कामगिरी बजावत आहे.

सीजी फूड्स आणि सीजी कॉर्प ग्लोबल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर वरुण चौधरी यांनी सांगितले की, ‘आयुष्मान खुराना यांच्यासोबत सहयोग करणे याला मी सर्वाधिक प्राधान्य दिले आणि मला आनंद आहे आम्ही इतक्या कमी वेळात एकमेकांसोबत हातमिळवणी केली. आज ब्रँडविषयीच्या माझ्या व्हिजनमध्ये विक्रीमध्ये लक्षणीय वाढ घडवून आणली जाण्याबरोबरीनेच देशभरातील वाय वाय चाहत्यांसोबत दृढ संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला जात आहे आणि अशा महत्त्वाच्या वेळी ही भागीदारी करण्यात येत आहे ही खूपच चांगली बाब आहे. भारत आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि वाय वाय ब्रँड भारतात आपली पाळेमुळे खोलवर रुजवून नेतृत्व स्थान सुनिश्चित करेल यावर मी माझे लक्ष केंद्रित केले आहे.

युवक, किशोरवयीन आणि वर्किंग प्रोफेशनल्स यांचा समावेश असलेल्या सध्याच्या नव्या पिढीसोबत अधिक दृढ संबंध प्रस्थापित करण्याचे धोरण वाय वायने आखले आहे. प्री-सीझन्ड नूडल्सचे उत्पादन करणारा एकमेव स्टॅन्डअलोन ब्रँड, अनौपचारिक भाषेत ‘ब्राऊन नूडल्स’ म्हणून ओळखला जाणारा वाय वाय बाजारपेठेत एक आकर्षक, रोचक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content