Homeटॉप स्टोरीकोविडविरोधात आयुष 64...

कोविडविरोधात आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीरही सज्ज!

कोविड-19च्या मध्यम तसेच तीव्र स्वरूपाच्या रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांवरील उपचारासाठी डीआरडीओने विकसित केलेले 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी), हे औषध वापरात आणले जात असतानाच रूग्णालयात दाखल न झालेल्या लघु आणि मध्यम स्वरूपाच्या कोविड रूग्णांवरील उपचारांसाठी आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीर, या औषधांचा मारा करण्याचे धोरण आयुष मंत्रालयाने हाती घेतले आहे.

देशातील कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाताना आयुष मंत्रालयाने रुग्णालयाबाहेरील (रूग्णालयात दाखल करण्याची गरज नसलेल्या) बहुसंख्य कोविड रुग्णांच्या हितासाठी आयुष 64 आणि काबासुरा कुडीनीर ही बहु-वनौषधीयुक्त आयुर्वेदिक औषधे वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशव्यापी मोहीम सुरू केली आहे.

या औषधांची कार्यक्षमता बहु-केंद्रीय क्लिनिकल चाचण्याद्वारे सिद्ध झाली आहे. आयुष मंत्री (अतिरिक्त प्रभार) किरेन रिजिजू यांच्या हस्ते राबवण्यात येणारी ही बहुपक्षीय मोहीम पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवणे सुनिश्चित करेल. सेवा भारती या मोहिमेत मुख्य सहयोगी आहे.

काबासुरा

मंत्रालयाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या विस्तृत जाळ्याचा वापर करून   वितरणाचे व्यापक धोरण आखण्यात आले असून ते  टप्प्याटप्प्याने राबवले जाईल आणि सेवा भारतीच्या देशभरातील नेटवर्ककडून यासाठी मदत पुरवली जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोविड-19चा देशभरात उद्रेक झाल्यापासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाबरोबर एकत्र काम करताना आयुष मंत्रालयाने कोविड-19चे नियंत्रण आणि त्याला आळा घालण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

आयुष मंत्रालयाने कोविड-19चे नियंत्रण आणि त्याला आळा घालण्यासाठी धोरण आखण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका आंतरशाखीय आयुष संशोधन आणि विकास कृती दलाची स्थापना केली आहे. सेंट्रल काऊन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक विज्ञान (सीसीआरएएस)ने विकसित केलेल्या आयुष-64 आणि काबासुरा कुडीनीर या शास्त्रीय सिद्ध औषधाबाबत विविध प्रकारे अभ्यास करण्यात आला आहे.

आयुष मंत्रालय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) सहकार्याने कोविड-19 रुग्णांच्या व्यवस्थापनात आयुष 64च्या सुरक्षिततेचे व कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी अलिकडेच बहुकेंद्रीय क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. आयुष मंत्रालयांतर्गत  केंद्रीय सिद्ध संशोधन मंडळाने (सीसीआरएस) कोविड-19 रुग्णांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी काबासुरा कुडीनीर या सिद्ध औषधाच्या क्लिनिकल चाचण्यादेखील करण्यात आल्या आणि सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या कोविड-19 संसर्गावरील उपचारातही उपयुक्त असल्याचे आढळले आहे.

1 COMMENT

  1. ह्या औषधांचा मारा करण्याचे धोरण ठरविले आहे, ह्याचा अर्थ काय होतो,?

Comments are closed.

Continue reading

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती,...
Skip to content