Homeकल्चर +पुरस्कारप्राप्त लघुपट 'टेलिंग...

पुरस्कारप्राप्त लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’चा बनणार माहितीपट!

समकालीन दिग्दर्शक सौरव विष्णू दिग्दर्शित पुरस्कारप्राप्त लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’ला २०२२-२०२३मध्ये सहा एपिसोड्सच्या माहितीपटामध्ये बदलण्यात येणार आहे. ऑस्करसाठी पात्र ठरलेला हा लघुपट जादुगोरा, झारखंडमधील आदिवासी कुटुंबांना सामना कराव्या लागलेल्या गंभीर वैद्यकीय स्थितींना दाखवतो.

या संकटाचे प्रमुख कारण युरेनियम रेडिएशन आहे. “सेक्स अॅण्ड दि सिटी” स्टार सिन्थिया निक्सॉन यांनी कथन केलेला २० मिनिटांचा लघुपट प्रेक्षकांना निरागस आदिवासी लोकांवर युरेनियमच्या घातक परिणामांची सविस्तर माहिती देतो. हा लघुपट बनवण्यासाठी पाच वर्षे अथक मेहनत घ्यावी लागली आणि १६० तासांहून अधिक काळ शूटिंग करावी लागली. आगामी माहितीपट जादुगोराच्या गाथेबाबत अधिक सविस्तर माहिती सांगेल.

१९५१मध्ये भारत सरकारला युरेनियममधील भवितव्य समजले आणि १९६७मध्ये देशातील सर्व युरेनियम खाण क्रियांवर देखरेख करण्यासाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यूसीआयएल)ची स्थापना करण्यात आली. यूसीआयएलची स्थापना जादुगोरा येथील आदिवासी कुटुंबांच्या जीवनासाठी विनाशकारी ठरले. हा हृदयस्पर्शी माहितीपट एक गाव सामना करत असलेल्या क्रूरतेला प्रकाशझोतात आणतो. आगामी माहितीपट गाव आणि आसपासच्या भागांमधील इतर टेलिंग पॉण्ड्सना, तसेच आण्विक कचरा डंपिंगच्या बेजाबबदार पद्धतींना दाखवेल. तलावांमधील गाळ स्थानिक माती व भूजलामध्ये मिश्रित होत आहे, ज्यामुळे स्थानिकांना विषारी विकिरण कचऱ्याचा उच्च धोका आहे.

टेलिंग पॉण्डचे दिग्दर्शक सौरव विष्णू म्हणाले की, आम्हाला या लघुपटासाठी प्रेक्षकांकडून मिळालेला सकारात्‍मक प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. आम्ही आता या कथानकाला सहा एपिसोड्सच्या माहितीपटामध्ये बदलत आहोत, ज्यामधून जादुगोराच्या संपूर्ण गाथेबाबत सखोल माहिती मिळेल. आम्ही रेडिएशन विषबाधेचे बळी पडलेल्या आणि अनेक पिढ्यांपासून यापासून पीडित असलेल्या १२ इतर कुटुंबांना दाखवणार आहोत. या माहितीपटामध्ये संबंधित कार्यकर्ते आणि आपल्या समाजातील इतर महत्त्वपूर्ण सदस्‍यांच्या मुलाखतींचादेखील समावेश आहे. हा मुद्दा अनेक दशकांपासून का दाबून ठेवण्यात आला आहे, याबाबत यात चर्चा करण्यात येईल. आमच्या नि:पक्षपाती कथेसह आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदिवासी लोकांच्या दु:खाची जाणीव करून देऊ.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content