Homeएनसर्कलनाताळ व नववर्षासाठी...

नाताळ व नववर्षासाठी भारतीयांची आशियाई देशांना पसंती!

नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी भारतीयांची आशियाई देशांना पसंती असल्याचे कायक, या जगातील आघाडीच्या ट्रॅव्हल सर्च इंजिनच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. नाताळ व नववर्ष कालावधीसाठी (१९ डिसेंबर व ६ जानेवारीदरम्यान) प्रवासाकरिता सीमेपलीकडे प्रवास करण्याला सुरूवात झाल्यापासून ती कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.

आगामी नाताळ व नववर्ष कालावधीदरम्यान देशांतर्गत प्रवासासाठी रिअर्न इकॉनोमी फ्लाइट सर्चेस २०१९मधील याच सर्च व ट्रॅव्हल कालावधीच्या तुलनेत जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहे. लांब पल्ल्यांसाठी आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट सर्च जवळपास ४९ टक्क्यांनी वाढले आहे, तर आशियासाठी शोधण्यात आलेल्या रिटर्न इकोनॉमी फ्लाइट्स सर्च जवळपास २० टक्क्यांनी वाढले आहे.

कायकचे येथील भारताचे कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले की, भारतीय कुटूंब व मित्रांसोबत पुन्हा धमाल करण्यासाठी निर्बंधमुक्त प्रवासाचा लाभ घेण्यास सज्ज असल्यामुळे कायकच्या डेटामधून यंदा नाताळ व नववर्ष साजरीकरणासाठी फ्लाइट सर्चमध्ये झालेली लक्षणीय वाढ निदर्शनास येते. दुबई, बँकॉक व बाली हे बारामाही आवडते गंतव्य आहेत, जेथे ते परदेशात प्रवासाच्या उत्‍साहासह तुलनेने कमी वेळेचे व जलद फ्लाइट्स देतात. गोवा आणि अंदमान व निकोबार बेटे देशांतर्गत लोकप्रिय गंतव्य आहेत, तसेच समुद्रकिनारे गंतव्यांप्रती लोकप्रियतादेखील उच्च आहे.

२९ व ३० डिसेंबर या देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी सर्वात किफायतशीर तारखा आहेत. सर्वोत्तम संभाव्य भाडे किंमत सुनिश्चित करू पाहणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी आम्ही तुमच्या निवडलेल्या गंतव्यस्थानासाठी दर सूचना सेट करण्याची शिफारस करतो. त्यामुळे तुमच्या फ्लाइटची उत्तम किंमत सुनिश्चित करण्यात मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय पर्यटकांवर वाढलेल्या विमानप्रवास दरांचा काहीही परिणाम झालेला नाही. येथे रिटर्न डॉमेस्टिक इकोनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत ₹१५,८४० आहे. त्यात २०१९च्या तुलनेत जवळपास ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. आशियासाठी रिटर्न इकोनॉमी फ्लाइट किंमत जवळपास ३६,८३४ रुपये आहे. त्यामध्ये जवळपास ५९ टक्के वाढ झाली आहे आणि रिटर्न इकोनॉमी लाँग हॉल फ्लाइट किंमत जवळपास ८०,००६ रुपये आहे, ज्यामध्ये जवळपास ५९ टक्के वाढ झाली आहे.

नाताळ व नववर्ष कालावधीदरम्यान प्रवासाकरिता भारतीय प्रवाशांसाठी रिटर्न इकॉनॉमी फ्लाइट्सच्या सर्वोच्च १० गंतव्य स्थानांमध्ये दुबई, गोवा, बँकॉक, बाली, अंदमान व निकोबार बेटे, माले, नवी दिल्ली, सिंगापूर, लंडन, हो ची मिन्ह सिटी या स्थानांचा समावेश आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content