Homeटॉप स्टोरीध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गाड्यांचे...

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नाशिकमध्ये १६७८ कोटी रुपये खर्चाच्या २०६ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या १२ प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. कर्कश हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा विचार करता येत्या काळात सगळ्या गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच वाजले पाहिजेत यासंदर्भात नियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-नाशिक महामार्गासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून येणाऱ्या दोन ते अडीच वर्षांत नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ दोन तासात होणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पांमध्ये १६७८ कोटी रुपये खर्चाच्या २०६ किलोमीटर लांबीच्या १२ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. नाशिकमध्येही लॉजिस्टिक पार्क बांधायला आपण तयार असून महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा असे त्यांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

या महामार्ग प्रकल्पांचा झाला कोनशिला समारंभ 

  1. राष्ट्रीय महामार्ग ३वरील चार नंबर श्रेणीची विविध बांधकामे, कल्याण/बापगाव, वशिंद, आसनगाव, आणि कसारा/वशाला जंक्शन. लांबी: ३ किमी, खर्च- ८४ कोटी रु.
  2. राष्ट्रीय महामार्ग ३वरील वरपे-गोंडे पट्ट्यात घोटी-सिन्नर जंक्शनजवळ उड्डाणपूल. १.६ किमी, खर्च- ४४ कोटी.
  3. राष्ट्रीय महामार्ग ३वर धुळे-पिंपळगाव विभागात पुरमपाडा इथं व्हीयूपी. लांबी- १.२ किमी, किंमत: २७ कोटी.
  4. राष्ट्रीय महामार्ग ३वर वडपे-गोंडे विभागात खान्देवली जंक्शन इथे व्हीयूपी. लांबी- ००.७० किमी, किंमत- २४ कोटी.
  5. राष्ट्रीय महामार्ग ७५३Jवरील नांदगाव-मनमाड भागाचे अद्ययावतीकरण. लांबी- २१ किमी, खर्च- २११ कोटी.
  6. राष्ट्रीय महामार्ग ६०वर सिन्नर-नाशिक मार्गावर, १८५/५०० व्हीयूपी @ Ch. लांबी- ०.८ किमी, किंमत: २५ कोटी.

या प्रकल्पांचे झाले राष्ट्रार्पण

  1. के के डब्लू महाविद्यालय ते हॉटेल जत्रादरम्यान उन्नत मार्गिका आणि पिंपळगाव (बी) येथे चार उड्डाणपूल, कोकणगाव आणि ओझरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र. ३. लांबी- ८ किमी. खर्च रु. ४४८ कोटी.
  2. विल्होली, ओझर येथे व्हीयूपी, गोदावरीवर मुख्य पूल आणि नाशिक शहरात एनएच-३वर रस्ता सुरक्षा कामे. लांबी ४.५ किमी. खर्चः रु. ५७ कोटी.
  3. एनएच-९५३च्या सापुतारा- वणी-पिंपळगाव बसवंत सेक्शनचे अपग्रेडेशन, लांबीः ४० किमी, खर्च रु. १८४ कोटी.
  4. एनएच-१६०च्या कुसुंबा मालेगाव सेक्शनचे अपग्रेडेशन. लांबीः ४२ किमी. खर्च रु. २०३ कोटी.
  5. एनएच-७५३J.च्या चाळीसगाव-नांदगाव सेक्शनचे अपग्रेडेशन. लांबीः ४४ किमी. खर्चः रु. १६९ कोटी.
  6. एनएच-८४८च्या नाशिक-पेठ ते राज्य सीमा सेक्शनचे रुंदीकरण/बळकटीकरण. लांबीः ३९ किमी. खर्चः रु. २०३ कोटी.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content