Homeकल्चर +स्टोरीटेल मराठीचे ‘एप्रिल...

स्टोरीटेल मराठीचे ‘एप्रिल पुल’!

लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, वक्ते, पटकथालेखक, नाटककार, नकलाकार, कवी, संगीतकार, गायक, पेटीवादक, अभिनेते म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, आपले भाई उर्फ पु. ल. देशपांडे. जगभरातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमींसाठी ‘स्टोरीटेल मराठी’ एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. एप्रिल महिना स्टोरीटेल मराठीवर “एप्रिल पुल” असणार आहे. पुलंच्या पुस्तकांची ‘ऑडिओ बुक्स’ संपूर्ण एप्रिल महिनाभर विश्वभरातील रसिकांना ऐकता येणार असल्याने खऱ्या अर्थाने रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

दर आठवड्याला पुलंचे एक लोकप्रिय पुस्तक नामवंतांच्या सुस्पष्ट आवाजात ‘ऑडिओ बुक्स’ फॉरमॅटमध्ये ‘स्टोरीटेल मराठीवर’ ऐकता येईल. हा महिना एप्रिल फुल! करण्याचा नाही  तर स्टोरीटेलवर ‘एप्रिल पुल’ ऐकण्याचा आहे! या महिन्यात स्टोरीटेलवर दर चार दिवसांनी पुलंचे नवे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे. १ एप्रिल रोजी ‘गुण गाईन आवडी’मधील काही लेख प्रकाशित होतील तर ४ एप्रिलला ‘मैत्र’ हे ऑडिओबुक प्रकशित होणार आहे!!

एप्रिल महिन्यातील “एप्रिल पुल”मध्ये दर आठवड्याला पुलंचं कोणतं पुस्तक ‘ऑडिओ बुक’ फॉरमॅटमध्ये रसिकांना ऐकायला मिळणार? आणि ते कोणत्या महनीय व्यक्तीच्या मधुर आवाजात असणार? याविषयीचं कुतूहल स्टोरीटेलने कायम राखलं असून ही माहिती दर आठवड्याला स्टोरीटेलवरच उघड केली जाणार आहे.

स्टोरीटेल सातत्याने आपल्या साहित्यप्रेमी रसिकश्रोत्यांसाठी नवनवीन योजना आणून त्यांच्या आवडीनिवडींना प्राधान्य देत असते. १ एप्रिल रोजी ‘गुण गाईन आवडी’मधील ‘माझे एक दत्तक आजोबा’, ‘डॉ. लोहिया: एक रसिक तापस’, ‘मंगल दिन आज’, तर ४ एप्रिलला ‘मैत्र’मधील ‘नानासाहेब गोरे: प्रफुल्ल होवोनि सुपुष्प ठेले’, ‘शाहू महाराज: एक धिप्पाड माणूस’, ‘हमीद: एक श्रेष्ठ प्रबोधनकार’, ‘जीवन त्यांना कळले हो’, ‘जाने क्यूं आज तेरे नाम पे रोना आया’ यांचा समावेश आहे. ही सर्व ‘ऑडिओ बुक्स’ लोकप्रिय अभिनेता सौरभ गोगटे यांच्या आवाजात आहेत.

‘स्टोरीटेल’ या जगविख्यात समूहाने भारतीय प्रादेशिक साहित्याला ऑडिओ बुक्सद्वारे जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. आपले मराठी साहित्य दीर्घकाळ टिकावे आणि नव्या पिढीसाठी हा वारसा जपला जावा याकरिता सर्वोत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे साहित्य ‘ऑडिओ बुक्स’च्या माध्यमातून जतन करण्याचे बहुमोल कार्य ते गेल्या पाच वर्षांपासून करीत आहे. आपल्या भाषेतील दर्जेदार आणि दुर्मिळ साहित्य अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा विडा स्टोरीटेलने उचलला आहे.

स्टोरीटेलवर “एप्रिल पुल”मधील पुलंचं लोकप्रिय साहित्य ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू. ९९९/- भरून मराठी भाषेतील हजारो ऑडिओबुक्स ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. रसिकांना ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.

‘पुलंची लोकप्रिय ऑडिओबुक्स‘ ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/gun-gaeen-awadi-2256406

https://www.storytel.com/in/en/books/maitra-2256407

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content