Homeबॅक पेजराष्ट्रीय क्रीडा पुरस्कारसाठी...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारसाठी ऑनलाईन अर्ज करा 2 नोव्हेंबरपर्यंत!

केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी पात्र खेळाडू/ प्रशिक्षक/ संस्था/ विद्यापीठांकडून अर्ज मागवले आहेत. संबंधित पोर्टलवर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंचे अर्ज dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर 2 नोव्हेंबर 2023पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

पुरस्कार मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र असलेल्या अर्जदारांना अधिकारी/व्यक्तींच्या शिफारशीशिवाय केवळ dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर वैयक्तिकपणे ऑनलाईन अर्ज करण्याची परवानगी आहे.

ऑनलाइन अर्ज करताना कोणतीही समस्या आली तर अर्जदार क्रीडा विभागाशी sportsawards-moyas[at]gov[dot]in या ईमेल आयडीवर किंवा 011-23387432 या दूरध्वनीवर कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 पर्यंत किंवा टोल फ्री क्रमांक 1800-202-5155, 1800258-5155 (कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान) संपर्क साधू शकतात.

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. चार वर्षांपेक्षा जास्त कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी एखाद्या खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो. चार वर्षांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेते घडवणाऱ्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो तर ध्यानचंद पुरस्कार क्रीडा विकासासाठी आयुष्यभर केलेल्या योगदानासाठी दिला जातो. क्रीडा संवर्धन आणि विकासाच्या क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावलेल्या कॉर्पोरेट संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद (माका) ट्रॉफी आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये एकुणात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला दिली जाते.

केंद्र सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवते. 2023 च्या या क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यासाठीच्या अधिसूचना www.yas.nic.in. या संकेतस्थळावर मंत्रालयानं अपलोड केल्या आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना/ भारतीय क्रीडा प्राधिकरण/ मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ/ क्रीडा प्रोत्साहन मंडळे /राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारे इत्यादींना त्यानुसार सूचित केले आहे.

Continue reading

ईक्षा देसाईंचे वयाच्या आठव्या वर्षींचे स्वप्न साकार! झाल्या ‘मिसेस इंडिया’!!

मुंबईतल्या अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मानसशास्त्रज्ञ ईक्षा देसाई यांनी वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट 'मिसेस इंडिया विजेती २०२६' म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह समाजात आनंदाची लाट उसळली आहे. यासोबतच...

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...
Skip to content