Homeकल्चर +येत्या १३ जूनला...

येत्या १३ जूनला येत आहे ‘आंबट शौकीन’!

आजवर मराठी चित्रपटांमध्ये विविध विषय हाताळले गेले आहेत. आता लवकरच तीन मित्रांची धमाल गोष्ट असलेला ‘आंबट शौकीन’ हा चित्रपट येत्या १३ जूनला प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले आहे. निलेश राठी, प्रफुल्ल काकाणी, रंजना लखोटिया, मोहित लखोटिया, अनघ भुतडा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेत्री पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, गौतमी पाटील, मोनालिसा बागल, अमेय वाघ, अक्षय टांकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, देवेंद्र गाडकवाड, रमेश परदेशी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. साई पियुष यांनी संगीत दिग्दर्शन, संकेत धोटकर यांनी ध्वनी आरेखन तर मधुराम सोळंकी यांनी छायांकन केलं आहे.

चित्रपटाच्या नावावरून कथानकाचा अंदाज बांधता येत असला तरी अनेक घडामोडींतून चित्रपटाची मनोरंजक कथा उलगडत जाते. तीन मित्रांच्या भोवती चित्रपटाची रंजक गोष्ट गुंफण्यात आली आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पाहवी अशी प्रत्येक पिढीची रंजक गोष्ट यातून आपल्याला अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्तम कलाकारांची फौज आणि धमाल रंजक कथानक यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजन करणारा ठरेल यात शंका नाही. त्याशिवाय उत्तम गाण्यांचीही जोड या चित्रपटाला आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content