Homeबॅक पेजपुढच्या सर्व निवडणुका...

पुढच्या सर्व निवडणुका महायुती एकत्रच लढणार!

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुती एकत्रितपणे लढेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्या जागावाटपाचे सूत्रही निश्चित झाल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर आज माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी पुढच्या सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजपा एकत्रपणे लढवेल, असे या बैठकीत निश्चित झाल्याचे सांगितले.

अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा यांच्यातील जागावाटपाचे एक सूत्र निश्चित करण्यात आले. त्याचवेळेला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दलही यावेळी चर्चा झाली. येत्या 19 जूनपूर्वी म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधी हा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे असे कळते.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात महिलांनाही स्थान दिले जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक मंत्र्याला किमान एक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी दिली जाईल. किंबहुना जो लोकसभेसाठी निवडणुकीत खासदार निवडून आणण्याची क्षमता राखेल त्यालाच मंत्रिपदाचे बळ दिले जाईल. याशिवाय सध्या मंत्रिमंडळात असलेल्या परंतु केंद्रीय नेतृत्त्वाच्या दृष्टीने अकार्यक्षम ठरणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल आणि त्या जागा खासदार निवडून आणणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातूनच भरल्या जातील, असे यावेळी ठरवण्यात आल्याचे समजते.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हानिकारक ठरणारी वक्तव्ये करणाऱ्या मंत्रिमंडळातील सदस्यांना वेळीच आवरण्याच्या सूचनाही अमित शाह यांनी या बैठकीत केल्याचे बोलले जाते.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content