Homeबॅक पेजअजित घोष महिला...

अजित घोष महिला क्रिकेटः भामा सी. सी. उपांत्य फेरीत

अंजू सिंगच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर स्पॉन्सर्स इलेव्हनचा १३७ धावांनी पराभव करुन भामा सी.सी.ने सलग तिसऱ्या विजयासह ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अंजूने २० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. ज्यामुळे भामाला ४ बाद २१४ असा धावांचा डोंगर रचता आला तोही १७ षटकांमध्ये. स्पॉन्सर्स संघाने मग २ बाद ७७ अशी मजल मारुन पराभव स्वीकारला.

यजमान स्पोर्टिंग युनियनने आपल्या शेवटच्या साखळी लढतीमध्ये बोरीवली सी.सी.ला ७ विकेटनी पराभूत केले. प्रतिस्पर्ध्यांना १५ षटकांमध्ये ८ बाद ९२ असे त्यांनी रोखले. मैदानामध्ये एका भागात चिखल असल्याने ही लढत उशिरा सुरु झाली. स्पोर्टिंगने हे लक्ष १२.२ षटकांमध्ये पार केले. त्यांच्या प्रांजळ मळेकरने ३७ चेंडूत ८ चौकाराच्या सहाय्याने नाबाद ५५ धावांची खेळी केली. स्पोर्टिंग युनियनचा हा दुसरा विजय. या गटामध्ये साईनाथ स्पोर्ट्स आणि महाराष्ट्र यंगचा प्रत्येकी एक सामना बाकी असून त्यांनाही उपांत्य फेरी गाठता येऊ शकते.

साईनाथने स्पोर्टिंग युनियनला मंगळवारी ८६ धावांनी पराभूत केले होते. त्याआधी बोरीवलीने साईनाथवर १९ धावांनी विजय प्राप्त केला होता. त्यामुळे साईनाथ आणि महाराष्ट्र यंग यांच्यातील विजेत्यासह स्पोर्टिंग युनियन उपांत्य फेरीत प्रवेशकरते होतील.

संक्षिप्त धावफलक-

साईनाथ स्पोर्टस् २० षटकांत ७ बाद १६० धावा- ‌(सिमरन डिमेलो २४, श्रावणी पाटील २५, सेजल विश्वकर्मा २६, गगना मुल्कला २३ धावांत ३ बळी) वि.वि. स्पोर्टिंग युनियन‌ १८.३ षटकात सर्वबाद ७४- (महिमा यादव १४, निधी घरत ५ धावांत ३ बळी, वेदिका पाटील १६ धावांत‌ ३ बळी, श्रावणी पाटील ११ धावांत २ बळी) सामन्यात सर्वोत्तम: निधी घरत
भामा सी.सी. १७ षटकात ४ बाद २१४- (अंजू सिंग १३४, हृदयेशा पटेल ४६, अनन्या बागवे १५ धावांत २ बळी) वि.वि. स्पॉन्सर्स इलेव्हन १७ षटकात २ बाद ७७ धावा- (रिया भावसार ३३ नाबाद, अनन्या बागवे २२) सामन्यात सर्वोत्तम: अंजू सिंग

बोरिवली सीसी १५ षटकात ८ बाद ९२- (स्वरा हिरे २९, अनन्य पथारी ११ धावांत ३ बळी, गगना मुल्कला २० धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग युनियन १२.२ षटकात ३ बाद ९३ धावा- (प्रांजळ‌ मळेकर नाबाद ५५ धावा) सामन्यात सर्वोत्तम: प्रांजळ मळेकर

स्पॉन्सर्स इलेव्हन २० षटकांत ७ बाद १०९ धावा- (अनन्या बागवे ३८, चित्रा घाडीगावकर २९ धावांत २ बळी) वि.वि. जे. भाटिया स्पोर्टस् क्लब १८.१ षटकांत सर्वबाद ७३- (काव्या दढवे २४, कनिका विजयकार्तिकराज १० धावांत ३ बळी, गरिमा वर्मा ५ धावांत ३ बळी) सामन्यात सर्वोत्तम: गरिमा वर्मा

डॅशिंग स्पोर्ट्सचा दुसरा विजय

त्याआधी कर्णधार सायना जोशीच्या ५५ धावांच्या भक्कम खेळीमुळे महाराष्ट्र यंगला ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गट साखळीमध्ये आपल्या पहिल्या विजयाची नोंद करता आली. स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशन यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील एका अन्य सामन्यात गत विजेत्या डॅशिंग स्पोर्ट्सने आपली घोडदौड चालू ठेवली. त्यांच्या खुशी निजाईने नाबाद ११४ धावांची खेळी केली. डॅशिंगने ४ बाद २१४ असा डोंगर रचला आणि प्रत्युत्तरा दाखल जे भाटिया सी. सी.ला २० षटकांमध्ये केवळ ९ बाद ६० धावा करता आल्या.

महाराष्ट्र यंगने ७ बाद १६१ अशी चांगली धावसंख्या उभी केली. सानयाला जुईली भेकरे हिने तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी वेंड्रा डिसूझा (३१) आणि जैनी शाह (३२)‌ यांनी ७६ धावांची सलामी दिली होती. बोरीवली सी.सी.ची सुरुवात खराब झाली. त्यानंतर हर्षदा साठे (२२), आणि रोमा शर्मा (४२) यांनी पडझड थांबवली. पण त्यांना धावगती वाढवीता न आल्याने त्यांच्या विजयाच्या आशा मावळल्या. खुशी निजाईने केवळ ६० चेंडूंमध्ये धडाकेबाज ११४ धावा केल्या. त्यात तिने १५ चौकार आणि २ षटकार ठोकले. खुशीने सलामीची रिया ठाकूर (३९) हिच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची तर तिसऱ्या विकेटसाठी राशी त्रिवेदीसह ६९ धावांची भागिदारी करत विजयाचा पाया रचला. डॅशिंगचा हा दुसरा मोठा विजय, ज्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित झाल्यात जमा आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content