Homeकल्चर +पापरी चक्रवर्ती यांना...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी ८ मार्चला केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल.

प्रसिद्ध गायिका गानसरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्मरणार्थ २०१९ सालापासून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र या संस्थेतर्फे शास्त्रीय गायनातील निपुण कलाकारास वार्षिक पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असा हा पुरस्कार आहे. २०२५ सालाच्या पुरस्कारासाठी बंगालच्या चंदन नगर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका विदुषी पापरी चक्रवर्ती यांची निवड झाली आहे. यावेळी पापरी चक्रवर्ती यांचे गायनदेखील होईल. त्यांना मंदार पुराणिक तबल्यावर तर सिद्धेश बिचोळकर संवादिनीवर साथ देतील, असे केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे..

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content