Homeपब्लिक फिगरतब्बल 40 वर्षांनंतर...

तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान जाणार ऑस्ट्रियात!

येत्या तीन दिवसांत रशिया येथे आयोजित 22व्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तसेच पहिल्याच ऑस्ट्रिया भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रवाना झाले. पंतप्रधान मोदी यांचे काल मॉस्कोत आगमन झाले. पंतप्रधानांचे आगमन झाल्यावर वनुकोवो-2 विमानतळावर रशियन महासंघाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव्ह यांनी त्यांचे औपचारिकरित्या स्वागत केले. भारताच्या पंतप्रधानांची गेल्या 40 वर्षांच्या काळातील ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट असणार आहे.

दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 22व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत या शिखर परिषदेचे सहअध्यक्ष असतील. त्याचबरोबर मॉस्कोमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशीदेखील ते संवाद साधतील. ऊर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर देवाणघेवाण, या क्षेत्रांसह इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि रशिया या देशांदरम्यान असलेल्या विशेष आणि विशेषाधिकारसहित धोरणात्मक भागीदारीने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मोठी प्रगती केली आहे. त्यावर पुढच्या सहकार्याबद्दल या दौऱ्यात पंतप्रदान मोदी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर चर्चा करतील.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह या द्विपक्षीय भागीदारीच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी तसेच विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांबाबतचे दृष्टीकोन सामायिक करण्यासाठी भारत अत्यंत उत्सुक आहे. शांत आणि स्थिर प्रदेश घडवण्यासाठी आम्ही आश्वासक भूमिका निभावू इच्छितो. या दौऱ्यामुळे रशियातील उत्साही भारतीय समुदायाला भेटण्याची संधीदेखील मिळणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी रवाना होताना सांगितले.

ऑस्ट्रिया भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन तसेच चँन्सेलर कार्ल नेहम्मर यांना भेटणार आहेत. ऑस्ट्रिया हा भारताचा भक्कम तसेच विश्वासू भागीदार आहे आणि उभय देश लोकशाही तसेच बहुलवादाचे आदर्श सामायिक करतात. भारताच्या पंतप्रधानांची गेल्या 40 वर्षांच्या काळातील ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट असणार आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञान तसेच शाश्वत विकासासह इतर अनेक नव्या आणि उदयोन्मुख  क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांदरम्यान असलेली भागीदारी आणखी नव्या उंचीवर जाईल, अशी अपेक्षा आहे.

परस्पर लाभदायी व्यापार आणि गुंतवणूकविषयक संधींचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रियाच्या चँन्सेलरसह दोन्ही देशांतील व्यापार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करण्याबाबत पंतप्रधान मोदी उत्सुक आहेत. व्यावसायिकता तसेच वर्तणूक यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रियामधील भारतीय समुदायाशीही ते संवाद साधणार आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content