Homeब्लॅक अँड व्हाईटतब्बल २७ वर्षांनी...

तब्बल २७ वर्षांनी ‘मिस वर्ल्ड’चे यजमानपद भारताकडे!

बहुप्रतिक्षित ७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी यंदा भारताची निवड झाली आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने याची नवी दिल्लीत घोषणा केली. भारताला असलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा, वैविध्यतेला उत्तेजन देण्याप्रती देशाची असलेली बांधिलकी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी वाटणारी कळकळ, यामुळे हा प्रतिष्ठेचा सन्मान भारताला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतातील चैतन्यपूर्ण परंपरा, संस्कृती आणि इतिहासामुळे हे सौंदर्य व फॅशनचे जागतिक केंद्र झाले आहे. मोहक निसर्ग, महत्त्वाच्या खुणा आणि आतिथ्यशीलता ही तर भारताची वैशिष्ट्ये आहेतच. ७१वी मिस वर्ल्ड स्पर्धा (२०२३) सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून उदात्त कामांना उत्तेजन देणार आहे. स्पर्धकांना त्यांच्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यास तसेच समाजासाठी योगदान देण्यास प्रेरणा देणार आहे. ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी आदी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसह अनेक भारतीय स्त्रियांनी हा जागतिक स्तरावरील सन्मान प्राप्त केला आहे.

मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जुलिया मोर्ली यावेळी म्हणाल्या की, ७१व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी भारतात होणार आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ३० वर्षांहूनही अधिक पूर्वी मी जेव्हा प्रथम भारताला भेट दिली त्या क्षणापासून मला या अविश्वसनीय देशाबद्दल खूप जिव्हाळा वाटत आला आहे. तुमची अनन्यसाधारण व वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे आणि श्वास रोखून धरायला लावणारी ठिकाणे उर्वरित जगाला कधी एकदा दाखवतो असे आम्हाला झाले आहे. एका असामान्य मिस वर्ल्ड फेस्टिवलची निर्मिती करण्यासाठी मिस वर्ल्ड लिमिटेड व पीएमई एण्टरटेन्मेंट एकत्र येत आहेत. ७१व्या मिस वर्ल्ड २०२३मध्ये, १३० राष्ट्रीय विजेत्यांचा एक महिन्यांचा ‘अविश्वसनीय भारतातील’ प्रवास  दाखवला जाणार आहे. ७१वी आणि सर्वांत नेत्रदीपक अशी मिस वर्ल्ड अंतिम फेरी प्रस्तुत करताना आम्ही या प्रवासाचे दर्शन घडवणार आहोत.”

७१वी मिस वर्ल्ड २०२३ ही स्पर्धा म्हणजे सौंदर्य, वैविध्य व सक्षमीकरणाचा गौरव करणारे एक असामान्य व्यासपीठ ठरणार आहे. १३०हून अधिक देशांतील स्पर्धक भारतात एकत्र येऊन त्यांच्या अनन्यसाधारण प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे व अनुकंपेचे दर्शन सर्वांना घडवणार आहेत. या स्पर्धक कठोर स्पर्धांच्या एका मालिकेत सहभागी होणार आहेत. यात प्रतिभादर्शन, क्रीडाविषयक आव्हाने आणि सेवाभावी उपक्रमांचा समावेश असेल. स्पर्धकांना बदलाच्या अपवादात्मक प्रतिनिधीत्व  करणाऱ्या त्यांच्यातील गुणांवर प्रकाश टाकण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. स्पर्धकांच्या निवडीसाठी अनेक फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. नोव्हेंबर/डिसेंबर २०२३मध्ये नियोजित महाअंतिम फेरीपूर्वी एक महिना या फेऱ्या घेतल्या जातील.

“७१व्या मिस वर्ल्ड २०२३ स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगाचे हार्दिक स्वागत करण्यासाठी तसेच देशाची शान, सौंदर्य व प्रगतीशील चैतन्य सर्वांपुढे आणण्यासाठी, भारत सज्ज आहे. या असामान्य प्रवासाला सर्व मिळून सुरुवात करत असतानाच, स्त्रियांमधील बदल घडवून आणण्याच्या शक्तीचा गौरव करण्यासाठी आमच्यासोबत या,” असे २०२२ सालची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का म्हणाली.

स्त्रियांमधील सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणे हा मिस वर्ल्ड किताबाचा दीर्घकाळापासून लौकिक आहे. स्त्रीच्या शारीरिक स्वरूपाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न ही स्पर्धा करते. हे एक व्यासपीठ असून, स्वत:चे म्हणणे मांडण्याची, स्वत:ला महत्त्वाच्या वाटणाऱ्या बाबींचे समर्थन करण्याची आणि जागतिक स्तरावर सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्याची क्षमता देते. ७१व्या मिस वर्ल्ड २०२३चे यजमानपद भूषवण्याच्या माध्यमातून, अर्थपूर्ण संभाषण व कृतींमधील एक संप्रेरक घटक म्हणून त्यांचे मूल्य वाढवण्याचे उद्दिष्ट भारतापुढे आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content