Homeब्लॅक अँड व्हाईटआदित्य बिर्ला फॅशनकडे...

आदित्य बिर्ला फॅशनकडे TCNS क्लोदिंगचे 51% भागभांडवल! 

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड कंपनीकडून, टीसीएनएस क्लोदिंग कंपनी लिमिटेडचे अधिग्रहण होण्यास, सीसीआय म्हणजेच, भारतीय स्पर्धा आयोगाने मंजूरी दिली आहे. ह्या व्यवहारात, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एक्वायरर) द्वारे अधिग्रहक, टीसीएनएस क्लोदिंग कंपनी लिमिटेडचे विस्तारित समभाग भांडवलाच्या 51% संपादन केले जाणार आहेत.

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड ही एक सूचीबद्ध कंपनी आहे आणि ती आदित्य बिर्ला समूहाचा भाग आहे. ह्या कंपनीचे किरकोळ दुकाने ऑनलाइन किरकोळ प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स मार्केटप्लेस द्वारे वस्त्रप्रावरणे, पादत्राणे आणि इतर ब्रँडेड उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.

तर लक्ष्यित टीसीएनएस क्लोदिंग कंपनी, महिलांची वस्त्रप्रावरणे, अलंकार,पादत्राणे आणि सौन्दर्यप्रसाधने, अशा वस्तूंचे उत्पादन आणि वितरण करणारी कंपनी आहे. त्यांचे डब्ल्यू, ऑरेलिया, विशफुल, इलेव्हन आणि फोक सॉन्ग असे विविध ब्रॅंड आहेत. ही कंपनी, उपरोक्त उत्पादनांच्या घाऊक रोख व्यवहाराच्या (फ्राँचायझी आउटलेटद्वारे विक्री सह) व्यवसायात देखील आहे. सीसीआयचा सविस्तर आदेश लवकरच उपलब्ध होईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content