HomeArchiveपाकिस्तानला जशास तसे...

पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे शक्य – मान्यवरांचा सूर

Details
पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे शक्य – मान्यवरांचा सूर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पाकिस्तानाच्या दहशतवादाला किंवा कुरापत्यांना जशास तसे उत्तर प्रत्येक पातळ्यांवर देणे शक्य आहे. प्रॉक्सी वॉर, मुत्सद्देगिरीशिवायच सैनिकी कारवाई, दहशतवादाविरूद्ध दहशतवादाने तसेच आर्थिक नाड्या आवळून एवढेच काय पण समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमं अशा साध्या सोप्या पद्धतीने मानसिक खच्चीकरणदेखील करता येणे शक्य आहे, जेणेकरून त्या राष्ट्राला जेरबंद करून चांगलाच धडा शिकवता येऊ शकतो, असे विचार मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आय़ोजित पुलवामा आणि बालाकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरूद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

प्रत्येक नागरिकामध्ये सैनिक दडलेला असावा, बांगलादेशी घुसखोरांना वेळीच रोखले पाहिजे तसेच मुख्य भूमीपासून 1200 किमी अंतरावर असलेल्या अंदमान आणि अन्य बेटांचा उपयोग सैनिकी तळ म्हणून व्हावा, या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांमागचा दृष्टीकोनदेखील स्पष्ट करून त्यांचे महत्त्वदेखील त्यांनी विशद केले.

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबतचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पाकिस्तानने केवळ दहशतवादी भारतात पाठविले नाही तर वेगवेगळ्या घटकांमध्येही त्यांचे हस्तक बसविले आहेत, मग ते राजकारण किंवा समाजकारण असो, त्यामुळेच एका विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होताना दिसते. त्यामुळे फोफावलेले हे कट्टरपंथी काश्मिरमध्ये जवानांवर दगडफेक करण्याचे धाडस करतात, त्यांचबरोबर त्यांनी भारताच्या विविध भागांमध्ये 3900 दंगे घडवून आणले आहेत, असे सांगितले. आपण धर्मनिरपेक्षच्या दांभिक बुरख्यात वावरत असून प्रतिक्रिया देत नाही, याचा फायदा पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहित होतो. हिंदू दहशतवादी ही व्याख्या मुळात चुकीची असून त्याचा बागुलबुवा म्हणजे एक मोठे षडयंत्र आहे. काऊंटर अॅटॅक हे तंत्र आपण यापुढे वापरले पाहिजे. आपली शक्ती ओळखून आपणच पाकिस्तानवर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला झेपेल आणि जमेल, त्या पद्धतीने दबाव निर्माण केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

माजी नौदल उपप्रमुख अभय कर्वे यांनी इंडियन आर्मी ही अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने युद्ध करून आपले लक्ष्य साध्य करत असते. त्यामुळे आपल्या सैन्य दलाला अधिकाधिक अद्ययावत ठेवण्यावर भर दिला पाहिजे तसेच आवश्यक खर्चासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. मग पाकिस्तानच काय अन्य राष्ट्रांनादेखील आपण पुरून उरू, असे सांगितले.

भारत हा अहिंसावादी देश असल्याचा प्रचार केला जातो, पण शांततेसाठी अहिंसक बनणे, हा तर्क अशक्यप्राय आहे, शांतीसाठी शक्तीचे प्रदर्शन आवश्यक आहे. कारण मारून युद्ध जिंकता येते, मरून नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक काळे यांनी केले. या चर्चासत्रास पोलीस तसेच सैनिकी दलातील आजी-माजी वरिष्ठ अधिकारी, सावरकरभक्त तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content