Details
अटलजीनाही आवडला असता असा हा कार्यक्रम!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर आलेली ही पहिली जयंती आहे. त्यानिमित्ताने आज देशात हजारो वा लाखो कार्यक्रम झाले. पण अटल बिहारी वाजपेयी यांना मनापासून आवडला असता, आवडेल, असा कार्यक्रम म्हणजे आजचा ब्रेल लिपीतील पुस्तक प्रकाशन सोहळा!, अशा शब्दात केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या “अटल विश्वास’ या नावाने कवितासंग्रहाचे ब्रेल लिपीत रूपांतर मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून मंगळवारी मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील स्पॅस्टीक सोसायटीच्या सभागृहात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे संपादन ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरूण भारस्कर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात सुरूवातीला हॅपी होम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता सादर केल्या. त्याला उपस्थितांची दाद मिळाली. या पुस्तकाचे संपादक अरूण भारस्कर यांनी संपादन आमची प्रेरणा विशद करताना सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता या सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध नाहीत. ही संकल्पना आमदार आशिष शेलार यांनी मांडली व त्यांनी तत्काळ त्याला लागणारी सर्व मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे अटलजींच्या “अटल विश्वास” या कविता ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध होऊ शकल्या. या कविता अंधांसाठी काम करणाऱ्या देशभरातील 500 संस्थांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत.
आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचा मुंबई आणि वांद्र्याशी असणारे नाते विशद केले. अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘अंधेरा छटेगा.. सुरज निकलेगा…कमल खीलेगा!” ही घोषणा ज्या जागेवरून केली तीच ही मुंबईची वांद्रे रेक्लेमेशनची जागा आहे. अटलजींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना या मुंबईशी जोडलेल्या असून त्यांच्या या कविता आणि त्यांच्या पहिल्या जयंतीचा कार्यक्रम म्हणूनच वांद्रे येथील या जागेत घेण्यात आला. ज्या सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे ते सभागृह समाजातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आणि ही संकल्पना ही वेगळी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात अटलजींसोबत काम करत असल्यापासूनच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते नेते म्हणून खूप मोठे होतेच. पण मी जेव्हा त्यांना भेटलो, प्रत्यक्ष बोललो त्यानंतर लक्षात आलं की, ते नेते, कवी म्हणून जसे मोठे होते त्यापेक्षा मोठे आणि उंच ते माणूस म्हणून होते. त्यांनी समाजातल्या छोट्या-छोट्या संस्थांशी संवाद साधला. सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत ते पोहोचले. त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर हजारो, लाखो कार्यक्रम झाले.. होत आहेत. पण, हा कार्यक्रम अत्यंत वेगळा आहे. म्हणूनच मी छोट्या सभागृहात होत असलेल्या कार्यक्रमासाठी दिल्लीहून आवर्जून आलो. या कार्यक्रमात सहभागी झालो. ब्रेल लिपीत अटलजींच्या कविता आल्यामुळे आता त्या “देवाच्या लेकरां” पर्यंत पोहोचणार आहेत, अशा शब्दात प्रभू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. व्यासपीठावर माजी उपमहापौर अलका केरकर, अजित मन्याल, प्रवीण क्षिरसागर, स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे आदींची उपस्थिती होती.”
“केएचएल न्यूज ब्युरो