HomeArchiveधारावी नवीन शहराप्रमाणे...

धारावी नवीन शहराप्रमाणे विकसित करणार – एकनाथ गायकवाड

Details
धारावी नवीन शहराप्रमाणे विकसित करणार – एकनाथ गायकवाड

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल अशी भूमिका दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मांडली आहे.

मुंबईतील एका सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअरफुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवरबुधवारी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भूमिका मांडली.

धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असून १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे. २००४ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प मार्गी लागल्यास त्याचे श्रेय काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळेल या भीतीपोटी त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना आणि भाजपने या प्रकल्पात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले. आजही सत्तेत आल्यानंतर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी शिवसेना-भाजपकडून दिशाभूल करण्याचे धोरण सातत्याने राबविण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

धारावी पुनर्विकासासाठी आतापर्यंत तीनदा निविदा काढण्यात आल्या. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाली. त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने तब्बल पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली. त्यानंतर आताही डिसेंबर, २०१८ मध्येम्हणजे तिसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या. मात्र, या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही सरकार धारावी पुनर्विकास मार्गीलावल्याचा दावा करत आहे, असेही गायकवाड म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content