HomeArchiveराहुल शेवाळे यांचा...

राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित – आदेश बांदेकर

Details
राहुल शेवाळे यांचा विजय निश्चित – आदेश बांदेकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पाच वर्षे केलेली विकासकामे आणि माता- भगिनींचा आशीर्वाद, यांच्या जोरावर राहुल शेवाळे पुन्हा एकदा विजयी होतील, अशा शब्दांत शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी शेवाळेंच्या विजयाचे भाकीत केले. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या चेंबूर येथील प्राचारफेरीत मंगळवारी बांदेकरांनी हा विश्वास व्यक्त केला. विकासकामांच्या जोरावर, महाराष्ट्रात महायुतीचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून येतील, असेही बांदेकर म्हणाले.

महाराष्ट्रातील माता-भगिनींचे लाडके भावोजी आदेश बांदेकर मंगळवारी महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारफेरीत सामील झाले. चेंबूर पूर्वेच्या शिवसेना शाखा क्रमांक 152 पासून या प्रचारफेरीला सुरूवात झाली. प्रचाररथावर स्वार होत बांदेकर यांनी राहुल शेवाळे यांना विजयी करण्याचं आवाहन चेंबूरमधील जनतेला केलं. सुमारे 5 वाजता चेंबूर नाक्यावरील शाखेतून सुरू झालेली ही प्रचारफेरी डायमंड गार्डन, चेंबूर चर्च आणि इथल्या परिसरात संध्याकाळी उशिरापर्यंत फिरत होती. यावेळी माता-भगिनींनी आपल्या लाडक्या भावोजींना आणि राहुल शेवाळे यांना ओवाळले. वरिष्ठांनी आशीर्वाद दिले. या प्रचारफेरीला आदेश बांदेकर, राहुल शेवाळे यांच्यासोबत शिवसेना उपनेते सुबोध आचार्य, विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार प्रकाश फतर्फेकर, नगरसेविका सुप्रदा फातर्फेकर, आशा मराठे, शांताताई नलावडे, कामिनी राहुल शेवाळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, शाखाप्रमुख शेखर चव्हाण आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content