HomeArchive300 म्हशींसाठी देवदूत...

300 म्हशींसाठी देवदूत ठरले आमदार प्रकाश सुर्वे

Details
300 म्हशींसाठी देवदूत ठरले आमदार प्रकाश सुर्वे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईसह पश्चिम उपनगरात गेल्या शुक्रवारी व शनिवारी दोन दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसांचा फटका जनावरांनासुद्धा बसला आहे. प्रभाग २६ लक्ष्मी नगर, बारक्या रामा कंपाऊंड येथे ५ फूट पाण्यात सुमारे 250 ते 300 म्हशी येथील तबेल्यात अडकल्या होत्या. गेल्या शुक्रवारची रात्र त्यांनी येथील तुंबलेल्या पाण्यात घालवली होती.

या घटनेची माहिती मागाठाणे येथील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पालिकेच्या आर दक्षिण विभागाला येथील पाण्याचा निचरा करण्याचे आदेश दिले. आमदार प्रकाश सुर्वे हे देवदूतासारखे धाऊन आल्याने येथील 250 ते 300 म्हशींचे जीव वाचले अशी माहिती येथील तबेलेधारकांनी दिली.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी संपूर्ण मतदारसंघात पायपीट करत येथील साचलेल्या पाण्याचा लवकर निचरा करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने ठोस पावले उचलत येथील पाण्याचा निचरा वेळीच केल्याने येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. यावेळी शाखाप्रमुख विठ्ठल नलावडे, सचिन केळकर, बापूसाहेब चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पावसात अडकलेल्या मगाठाणे येथील नागरिकांना जर कोणतीही मदत लागल्यास त्यांना मदतीचा हात पुढे करत आमदार सुर्वे यांनी सुमारे दीड लाख एसएमएस आणि वॉट्सअप त्यांच्या मोबाईल क्रमांक 9821034923 सह पाठवले. तसेच सोशल मीडियाचा वापर करत त्यांनी सदर मेसेज फेसबुकवरूनसुद्धा शेअर केला असे समजते.
 
येथील खडी मशीनमधून येणारे पावसाचे पाणी नाल्यात जाते. त्यातच येथील नाला अरूंद केल्याने तो तुडूंब भरून वाहू लागतो, त्यामुळे लगतच्या लक्ष्मीनगर आणि या बारक्या रामा कंपाऊंडमधील तबेल्यात शिरते. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते. गेल्या वर्षी अशाचप्रकारे लक्ष्मीनगरातील घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सदर नाला लवकर रूंद करण्याचे आश्वासन आमदार सुर्वे यांनी येथील नागरिकांना दिले आहे.
 
प्रभाग ५ पांडे नगर दहिसर (पूर्व) येथे साचलेले स्वतः आमदार सुर्वे यांनी उभे राहून साफ करून घेतले. सोबत नगरसेवक संजय घाडी उपस्थित होते. प्रभाग ११ श्रीकृष्ण नगर येथील नदीची पातळी वाढल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यासाठी स्वतः उभे राहून त्यांनी येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. यावेळी विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, उपविभागप्रमुख सुनील डहाळे उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 25 येथील जानूपाडा-पांडेनगर-वैभवनगर या विभागांमधे नगरसेविका माधुरी योगेश भोईर आणि म.न.पा आधिकाऱ्यांसमवेत नाल्यांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले. यावेळी सोबत शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, अनिल पटेल आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content