HomeArchiveमुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा...

मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार!

Details
मुंबईमध्ये ८६ हजारांपेक्षा जास्त बोगस मतदार!

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
भारतीय जनता पक्षाने मतदारयादीमधील बोगस व दुसऱ्यांदा नावे असलेल्या मतदारांची नावे काढण्याची मागणी केली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. मुंबई शहरामध्ये सुमारे ८६ हजारहून जास्त असे मतदार आहेत ज्यांच्याकडे दोन मताधिकार आहेत किंवा ते नागरिकच नाहीत. अशी नावे तत्काळ हटवण्याची कारवाई केली जावी, असे ते म्हणाले.
 
 
आमदार लोढा यांनी निवडणूक आयोगाला मुंबई शहरामधील ८६ हजार बोगस मतदारांची यादीही सुपूर्द केली आहे. मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बांग्लादेशी नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची‌ नावेसुद्धा निवडणुकीपूर्वी तत्काळ काढावीत. असेही त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. 
 
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्यासह आयोगाच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी एका भेटीमध्ये लोढा यांनी ही मागणी केली. त्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले की, खऱ्या मतदाराद्वारेच आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्षात असलेल्या नागरिकाद्वारेच आपला प्रतिनिधी निवडला जाणे निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक आहे. पण, मुंबईत मोठ्या संख्येत खोटे मतदारही मत द्यायला तयार आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांची नावे मतदारयादीमधून काढून टाकणे आवश्यक आहे.
 
मुंबई महानगराच्या विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिकांचीही नावे आहेत असे समजले आहे. तपासल्यावर असे निदर्शनास आले आहे की, मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये सध्या सुमारे ८६ हजारांपेक्षा जास्त अशी नावे आहेत जी एक तर दुसऱ्या अन्य विधानसभा क्षेत्रातही आहेत किंवा स्थानिक नागरिकच नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन बोगस मतदारांची तपासणी करून त्यांची नावे मतदारयादीतून काढणे गरजेचे आहे.
 
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आवश्यक निर्देश देऊन मुंबई शहरातील सर्व बोगस मतदार व अन्य विधानसभा क्षेत्रात नाव असूनही इथे मतदान करणाऱ्यांची नावे काढण्याची कारवाई करावी. दिवाळी सुट्ट्यांच्या आधी निवडणुका करण्याची व युवा मतदारांनी मतदान करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची मागणीसुद्धा लोढा यांनी केली आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“भारतीय जनता पक्षाने मतदारयादीमधील बोगस व दुसऱ्यांदा नावे असलेल्या मतदारांची नावे काढण्याची मागणी केली आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. मुंबई शहरामध्ये सुमारे ८६ हजारहून जास्त असे मतदार आहेत ज्यांच्याकडे दोन मताधिकार आहेत किंवा ते नागरिकच नाहीत. अशी नावे तत्काळ हटवण्याची कारवाई केली जावी, असे ते म्हणाले.”
 
 
आमदार लोढा यांनी निवडणूक आयोगाला मुंबई शहरामधील ८६ हजार बोगस मतदारांची यादीही सुपूर्द केली आहे. मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बांग्लादेशी नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची‌ नावेसुद्धा निवडणुकीपूर्वी तत्काळ काढावीत. असेही त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. 
 

“मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र यांच्यासह आयोगाच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी एका भेटीमध्ये लोढा यांनी ही मागणी केली. त्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले की, खऱ्या मतदाराद्वारेच आणि त्या क्षेत्रात प्रत्यक्षात असलेल्या नागरिकाद्वारेच आपला प्रतिनिधी निवडला जाणे निरोगी लोकशाहीसाठी आवश्यक आहे. पण, मुंबईत मोठ्या संख्येत खोटे मतदारही मत द्यायला तयार आहेत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांची नावे मतदारयादीमधून काढून टाकणे आवश्यक आहे.”
 

“मुंबई महानगराच्या विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिकांचीही नावे आहेत असे समजले आहे. तपासल्यावर असे निदर्शनास आले आहे की, मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये सध्या सुमारे ८६ हजारांपेक्षा जास्त अशी नावे आहेत जी एक तर दुसऱ्या अन्य विधानसभा क्षेत्रातही आहेत किंवा स्थानिक नागरिकच नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन बोगस मतदारांची तपासणी करून त्यांची नावे मतदारयादीतून काढणे गरजेचे आहे.”
 

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आवश्यक निर्देश देऊन मुंबई शहरातील सर्व बोगस मतदार व अन्य विधानसभा क्षेत्रात नाव असूनही इथे मतदान करणाऱ्यांची नावे काढण्याची कारवाई करावी. दिवाळी सुट्ट्यांच्या आधी निवडणुका करण्याची व युवा मतदारांनी मतदान करण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची मागणीसुद्धा लोढा यांनी केली आहे.

Continue reading

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी...

रोहिणी हट्टंगडी यांना भारताबाहेरचा पहिला पुरस्कार!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२६ची सुरुवात हॉलिवूडच्या ग्लॅमरला साजेशा दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्याने झाली. कॅमेऱ्यांच्या लखलखत्या फ्लॅशमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज तारे-तारकांच्या शानदार आगमनाने सॅन होजेतील वातावरण मराठमोळ्या उत्साहाने भारून गेले. या सोहळ्यात हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी...

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...
Skip to content