HomeArchiveमहापौरांच्या पुस्तकाचे उद्धव...

महापौरांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

Details
महापौरांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

    25-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या “”ध्यास शिवसेनेचा.. मुंबईच्या विकासाचा..” या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौर पदावर आलेल्या महाडेश्वर यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.
 
 
या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा सचित्र व शब्दबद्ध असा बोलका आढावा घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब, माजी लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी, आमदार तृप्ती सावंत, रजनी मेस्त्री, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 

 
 
आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदयच! राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या मुंबापुरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना शिवसेनेने उराशी जपलेले मुंबापुरीच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्याचा उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईसारख्या महानगरीला सातत्याने भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा निर्णय करणे, केंद्र सरकारच्या “”स्वच्छ भारत”” अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळाला. गरजू रूग्णांना महापौर निधीतून मिळणारी ५ हजारांची मदत २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय महापौरांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
 

 
 

 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या “”ध्यास शिवसेनेचा.. मुंबईच्या विकासाचा..” या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौर पदावर आलेल्या महाडेश्वर यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.”
 
 
“या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा सचित्र व शब्दबद्ध असा बोलका आढावा घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब, माजी लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी, आमदार तृप्ती सावंत, रजनी मेस्त्री, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.”
 
 

 
 
“आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदयच! राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या मुंबापुरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना शिवसेनेने उराशी जपलेले मुंबापुरीच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्याचा उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईसारख्या महानगरीला सातत्याने भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा निर्णय करणे, केंद्र सरकारच्या “”स्वच्छ भारत”” अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळाला. गरजू रूग्णांना महापौर निधीतून मिळणारी ५ हजारांची मदत २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय महापौरांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.”

 

 
 

 
 

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content