HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगली पं. भातखंडे स्मृती संगीत सभा!

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगली पं. भातखंडे स्मृती संगीत सभा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने पं. वि. ना. भातखंडे स्मृतिनिमित्ताने सोनल शिवकुमार यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. य. वि. आणि सुधा भातखंडे यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. सोनल यांचे प्रशिक्षण प्रथम पं. प्रभाकर कारेकर व नंतर माणिक भिडे यांच्याकडे झाले.

या कार्यक्रमात त्यांनी राग भीमपलासमधील पारंपारिक बंदिश, रे बिरहा मांडली व द्रूत ख्याल, मिल जान या पिया रे (आध्या. ताल) व तराणा तादियनरे तादियनरे (एकताल) गायल्या. त्यानंतर राग हंसध्वनीच्या दोन रचना गायल्या. मध्यतम (अध्या ताल) आज सजन संग व तराणा (तीनताल) तानोम दिर दिन तदारेनंतर झूला देखो सावरे के संग गायले.

मध्यांतरानंतर मालकंस बडा ख्याल (झपताळ) आदी दाता अंत दयावंत व द्रूत (तीनताल) मैं को सो बताऊं या दोन बंदिशा पेश केल्या. बसंत राग गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. त्यात मध्यलय (एकताल) होरी आई जनत बसंत व द्रूत (तीनताल) सरस सुगंध या चीजा त्यांनी मांडल्या. त्यात तबलासाथ तेजोवृष जोशी व संवादिनी साथ ज्ञानेश्वर सोनावणे यांनी केली. त्यांच्या उत्कृष्ट साथीमुळे कार्यक्रमाची रंगत खूपच वाढली.

सोनल यांची मुद्रा प्रसन्न आहे व राग मांडताना त्यांच्या अथक परिश्रमाची जाणीव होत होती. निकोप आवाज, उत्कृष्ट बढत व सफाईदार ताना व बोलतानाही त्यांच्या गायनाची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. जवळजवळ तीन तास चाललेल्या या मैफिलीनंतर श्रोते गायकीने अत्यंत समाधानी व तृप्त झाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content