HomeArchiveआनंद घ्या ललित...

आनंद घ्या ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनाचा!

Details
आनंद घ्या ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनाचा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालय आणि राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात आयोजित ललित कला अकादमीच्या हीरक महोत्सवी (साठाव्या) राष्ट्रीय कलाप्रदर्शन, आदिवासी कलाप्रदर्शन आणि कलामेळ्याचे उदघाटन 25 मार्चला गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते झाले. या कलाप्रदर्शन आणि कलामेळ्याच्या निमित्ताने रसिकांना जगप्रसिद्ध चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृतींबरोबरच 25 मार्च ते ३1 मार्च या कालावधीत जे. जे. कला महाविद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी संगीत, नृत्य, नाटक यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद घेता येत आहे.

उदघाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध बासरीवादक चेतन जोशी, सतार वादक प्रकाश पौनीकर आणि मिलिंद नाईक, पखवाजवादक पं. रविशंकर उपाध्याय तसेच गिरीश चारवड आणि रवी शर्मा यांच्या सरोद आणि तबला जुगलबंदीने उपस्थित श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 मार्च रोजी नृत्यरंग समूहाच्या कत्थक कार्यक्रमाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यानंतर प्रसिद्ध विचारवंत, कवी, पत्रकार रामदास फुटाणे यांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाने रसिकांना नेहमीप्रमाणेच निखळ आनंद दिला.

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या या ठेव्यात बुधवार दिनांक 27 मार्चला संध्याकाळी 6 वाजता “या मातीवर इतिहास उभा” या पुस्तकावर आधारित मंजुषा राजस जोहर आणि शुभा वैद्य यांच्या नाटकाचे सादरीकरण झाले. गुरूवारी, 28 मार्चला आशुतोष आपटे यांच्या “आपट्याची पाने” या नाट्यकृतीबरोबरच मेधा घाडगे आणि समुहाच्या ‘रंगबाजी’ या दिलखेचक लावणी कार्यक्रमाची रसिकांना पर्वणी आहे. शुक्रवारी 29 मार्चला संध्याकाळी 6 वाजल्यापासून दोन तास सुनील वालावलकर यांच्या ‘हे मृत्युंजय’ या नाटकाचा आनंद रसिकांना घेता येईल.

शनिवारी 30 मार्चला मूळच्या उत्तर प्रदेशच्या पण आता मुंबईच्या रहिवासी असलेल्या संगीता श्रीवास्तव यांच्या ‘माँ मुझे जीने दो’ या संवेदनशील नाटिकेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सुनील बोरगावकर यांच्या शास्त्रीय गायनाची पर्वणी अनुभवता येईल. रविवारी 31 मार्चला कलामेळ्याच्या समारोपाच्या दिवशी या सांस्कृतिक कार्यक्रमात नलिनी कमलिनी यांचे कत्थक नृत्य तसेच प्रसिद्ध गझलगायक भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी रसिक नक्कीच मंत्रमुग्ध होतील. चित्र, शिल्प, कलाप्रदर्शन तसेच कलामेळ्याच्या निमित्ताने आयोजित हे सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य आहेत याची रसिकांनी नोंद घ्यावी.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content