HomeArchiveचित्रकार वासुदेव गायतोंडे...

चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील हिंदी ग्रंथाचं गुलजार यांच्या हस्ते प्रकाशन!

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
गायतोंडे हे अस्सल कलावंत होते आणि असे कलावंत समाजाला नेहमीच समृद्ध करत असतात, असं प्रसिद्ध कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी शनिवारी सांगितलं. भारतातील अमूर्त चित्रकलेचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासुदेव गायतोंडे यांची शैली, आयुष्य आणि त्यांचा अमूर्त कलेमागचा विचार चितारणाऱ्या ‘गायतोंडे’, या हिंदी पुस्तकाचं प्रकाशन गुलजार यांच्या हस्ते, आज गुढीपाडव्याचा मुहूर्तावर मुंबईतल्या नॅशनल गॅलरी फॉर मॉडर्न आर्ट अर्थात एनजीएमएच्या सभागृहात करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.

थोर अमूर्तनवादी चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या कला आणि आयुष्यावर आधारित ‘गायतोंडे‘ या मराठी गौरवग्रंथाचा हा हिंदी अनुवाद डॉ. स्मिता दाते यांनी केलेला आहे. मला चित्रकलेचं फारसं ज्ञान नाही. मात्र मी चित्रकला जाणिवेच्या पातळीवर समजून घेऊ शकतो आणि त्या जाणिवेतूनच माझी कविता आकारते, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपल्या चित्रकलेवर आधारित काही कवितांचं वाचनही केलं.

गायतोंडे यांच्यासारख्या विलक्षण प्रतिभावंताच्या कार्याचा आढावा घेणारा हा ग्रंथ हिंदीत अभूतपूर्व असून या ग्रंथासाठी चिन्हचे संपादक सतीश नाईक यांनी घेतलेले कष्ट पाहिले की बाबा आमटे यांची आठवण होते, असं सुप्रसिद्ध अनुवादक प्रकाश भातंब्रेकर यावेळी म्हणाले. हा ग्रंथ म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हा ग्रंथ जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित होण्याची गरज असून त्याचा इटालियन भाषेत अनुवाद करण्याची इच्छा, यावेळी उपस्थित इटालियन भाषेच्या प्राध्यापक डॉ. प्रतिष्ठा सिंह यांनी व्यक्त केली. हा महत्त्वाचा ग्रंथ हिंदीत आणल्याबद्दल त्यांनी `चिन्ह’चे आभार मानले.
या पुस्तकाच्या निमित्तानं गायतोंडेंसारख्या प्रतिभावंताला चाळीस वर्षांनंतर योग्य ती प्रसिद्धी मिळत आहे याबद्दल चिन्ह प्रकाशनचे संपादक नाईक यांनी समाधान व्यक्त केलं. आपण गेली वीस वर्षं या ग्रंथावर काम करत होतो. हा प्रवास अतिशय रोमहर्षक होता, असंही ते म्हणाले.

ललित कलांना प्रोत्साहन आणि नव्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान करणं ही ललित कला अकादमीची जबाबदारी आहे. त्यामुळे या ग्रंथाचं प्रकाशन करताना आपल्याला आनंद होत आहे, असं ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांनी यावेळी सांगितलं. ‘गायतोंडे’ या ग्रंथाच्या हिंदी अनुवादामुळे वासुदेव गायतोंडे यांच्यासारख्या लोकोत्तर कलावंताची कलादृष्टी देशभरातल्या रसिक आणि कला-विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी हा या ग्रंथाच्या प्रकाशनामागचा उद्देश आहे, या शब्दांत पाचारणे यांनी अकादमीची भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाला देशभरातले अनेक चित्रकार, विद्यार्थी आणि कलारसिक उपस्थित होते. मनीषा कोरडे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

अकादमीतर्फे साठावं राष्ट्रीय कला प्रदर्शनही नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि शिवाय जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये भरविण्यात आलं असून, 16 एप्रिलपर्यंत ते सर्व कलाप्रेमींसाठी खुलं राहणार आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content