HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकारच्या...

स्वा. सावरकर स्मारकारच्या मोडी लिपी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

Details
स्वा. सावरकर स्मारकारच्या मोडी लिपी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे २०१९ या दिवशी पाचवी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा मुंबई, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये भरविण्यात आली. चारही केन्द्रांवर मिळून २०० स्पर्धकांनी भाग घेतला. यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे सर्वात तरूण कोल्हापूर येथे १२ वर्षीय पार्थ कांबळे तर मुंबई केंद्रावर १४ वर्षीय जिष्णू बांदोडकर तसेच सर्वात ज्येष्ठ ८२ वर्षीय रमेश वाघ, मुंबई तर ८१ वर्षाचे पांडुरंग गुजर, कोल्हापूर यांनीही सहभाग नोंदवला.

जिष्णू बांदोडकर आणि त्याची माता राजश्री बांदोडकर यांनी सलग पाचव्या वर्षी उपस्थिती नोंदवली. नाशिकमध्ये सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरीक मोठ्या उस्ताहाने सहभागी झाले. अहमदनगर शहरामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. मुंबई केन्द्रावरील व्यवस्था सर्वोत्तम होती. सर्व स्पर्धकांना सावरकर स्मारकाने मध्यंतराला चहा/कॉफी आणि नाष्ट्याची विनामूल्य व्यवस्था केली होती. मुंबई केन्द्रावर मिश्र वयोगट होते. मुंबई आणि अहमदनगर या केन्द्रांवर काही स्पर्धकांनी सलग पाचव्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. धुळे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चिपळूण, पालघर, डहाणू अशा दूरच्या ठिकाणांहून स्पर्धक सावरकर स्मारक, मुंबई येथे स्पर्धेकरीता आले. सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, बीड, उस्मानाबाद येथून स्पर्धक कोल्हापूर केन्द्रावर पोहोचले होते. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वर्षी अधिक शहारांचा समावेश यात केला जाईल असे सांगितले. विलास कडू, सुहास पटवर्धन, गंगाराम बाईत, मिलिंद रहाटे आणि जागतिक मोडी लिपी प्रसार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content