HomeArchiveस्टार, यार, कलाकार..

स्टार, यार, कलाकार..

Details
“स्टार, यार, कलाकार..”

    13-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
महेश पावसकर,
संपादक, गोरेगाव मिरर
mirrorgoregaon@gmail.com
 
 
“कुछ पलों की तालीयों की गूंज जिंदगी का सन्नाटा खत्म नही कर सकती”. परिस्थितीने गांजलेल्या एकेकाळच्या अवॉर्ड विजेत्या कथ्थक डान्सरच्या तोंडचा हा डायलॉग त्याच्या पत्नीला कलाकाराच्या आयुष्याच्या खडतर वास्तवाची जाणीव करून देतो आणि टीव्हीच्या पडद्यावर हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या काळजालादेखील चटका बसतो. याच आठवड्यात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या ‘तारा फ्रॉम सातारा’ या टीव्ही मालिकेतला हा सीन राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या अभिनेत्याने, उपेंद्र लिमयेने अक्षरशः जिवंत केला आहे. ‘मुक्ता’, ‘बनगरवाडी’, ‘सरकारनामा’, `ध्यासपर्व’, `सिंधुताई सपकाळ’ ‘येलो’,`ढग’,`तुह्या धर्म कोंचा’, ‘सुर सपाटा’,`पेज थ्री’, ‘चांदनी बार’,`ट्रॅफिक सिग्नल’ आणि ‘मुळशी पॅटर्न’सारख्या मराठी व हिंदी चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाने मिळालेल्या व्यक्तिरेखांचं सोनं करणारा कलाकार उपेंद्र लिमये म्हणजे बॉलिवूडला लाभलेला एक ‘परीस’ आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
 
 
जन्माने पुणेकर असलेल्या उपेंद्रला शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. अभ्यासापेक्षा अभिनयाच्या/कलेच्या क्षेत्रात रस असलेल्या उपेंद्रला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की, तुला ज्या क्षेत्रात जायचंय, त्या क्षेत्रात जा. पण, जाशील तेथे ‘top’ला जा. आज २५ वर्षानंतर अभिनयाच्या क्षेत्रात उपेंद्रने जी उंची गाठली आहे, ती पाहता वडिलांचे शब्द त्याने प्रत्यक्षात खरे करून दाखविले असेच म्हणावे लागेल. ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळ्या उपेंद्रने हिंदी टीव्ही मालिकांच्या जगात दमदार पदार्पण केले आहे. साताऱ्यात राहणाऱ्या आणि आयुष्यभर कलेवर निष्ठा ठेवणार्याग ‘सचिन माने’ नामक कत्थक डान्सरला एका विशिष्ट परिस्थितीमुळे सातारा सोडून मुंबई गाठावी लागते. `हीप-होप’ व पाश्चिमात्य नृत्याचा झगमगाट असलेल्या मुंबईच्या ‘कल्चर’बद्दल त्याला मनस्वी तिटकारा असतो. पण याच कल्चरची आणि नृत्यकलेची आवड असलेल्या त्याच्या स्वतःच्या मुलीबरोबर त्याचा होणारा संघर्ष हे या मालिकेचे कथाबीज आहे. ‘रियालिटी शो’ आणि ड्रामा यांचे अनोखे ‘fusion’ असलेली ही मालिका आहे, ज्यात बाप आणि मुलीच्या नातेसंबंधातील हळुवार भावविश्व दिग्दर्शकाने अचूक टिपलेले आहे.
 
 
या मालिकेबाबत बोलताना उपेंद्र सांगतो की, नाट्य, चित्रपट आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांपैकी टीव्ही हे माध्यम सर्वात जास्त शक्तिशाली आहे. कारण, ते घरातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला थेट भिडत असतं. २००८ ते २०१६ अशी सुमारे आठ वर्षं ठरवून टीव्ही मालिका न करणाऱ्या उपेंद्रला ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेच्या कथानकाने मोहिनी घातली. एक जबरदस्त नाट्य आणि ज्यात अभिनेत्याचा कस लागेल असे कंटेंट या मालिकेत असल्यानेच आपण हिंदी मालिका विश्वात एंट्री घेण्याचा निर्णय घेतल्याचे उपेंद्र सांगतो. पदार्पणातच जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन लाभलेला ‘मुक्ता’ हा चित्रपट उपेंद्रला मिळाला आणि त्यानंतर अमोल पालेकर, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, सतीश राजवाडे, अनंत महादेवन, मधुर भांडारकर व राम गोपाल वर्मा यासारख्या एकापेक्षा एक दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटातून उपेन्द्रला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला मिळाल्या. राजीव पाटील दिग्दर्शित ‘जोगवा’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. या चित्रपटातील त्याचा भूमिकेला ‘फोर्ब्स’ च्या यादीमध्ये 25 Greatest Acting Performances of Indian Cinema म्हणून गौरविले गेले आणि अवघ्या बॉलिवूडचे लक्ष या अभिनेत्याकडे वेधले गेले.
 
 
केवळ वास्तववादी चित्रपटातच काम करणे इथवर न थांबता ‘बदाम राणी गुलाम चोर’ ‘शेंटिमेंटल’ यासारख्या विनोदी चित्रपटातूनदेखील वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून उपेंद्रने त्याच्या अभिनयातील चतुरस्त्रपणाचे दर्शन घडविले आहे. सुमारे १७ वर्षांपासून गोरेगावात राहणाऱ्या उपेंद्र लिमयेला गोरेगाव एवढे प्रिय का आहे, असे विचारले असता तो सांगतो की, तो माझा ‘स्ट्रगल’चा काळ होता. गोरेगावमधल्या नागरी निवारा परिषदेत मी भाड्याच्या घरात ‘वन रूम किचन’मध्ये राहयचो. मुंबईत यापेक्षा स्वस्त आणि प्रशस्त असे ‘वन रूम किचन’चे घर कुठेही नसल्याने व सर्व दृष्टीने सोयीस्कर असलेले गोरेगाव निवडले. इथली ‘नागरी निवारा परिषद’ वसाहतीतील माणसं खूप प्रेमळ आहेत. इथे जणू ‘मिनी कोकण’च वसलेलं आहे. सर्व मराठमोळे सण आणि उत्सव येथे अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. इथली ‘रत्नागिरी’ ‘समाधान’ ही हॉटेल्स खवय्यांना तृप्त करतात. गोरेगाव स्टेशनजवळचे ‘सत्कार हॉटेल’ ‘दत्तप्रसाद स्नॅक्स’ यांनी मराठमोळी संस्कृती येथे टिकवली आहे. २००९मध्ये मी ‘नागरी निवारा परिषद’मधील ‘वन रूम किचन’मधून ‘न्यू म्हाडा कॉलनी’मधील ‘टू बीएचके’मध्ये शिफ्ट झालो ते केवळ याच परिसरात राहयला मिळावे म्हणून. माझी पत्नी ‘स्वाती’, ही व्यवसायाने डॉक्टर आहे. याच परिसरात तिचे क्लीनिकदेखील आहे. मुलगी ‘भैरवी’ एका प्रोडक्शन हाऊसमध्ये नुकतीच जॉईन झालीय तर मुलगा ’वेध’ नववीमध्ये शिकत आहे. एकंदरीत मी जन्माने जरी पुणेकर असलो तरी आता मात्र पुरता गोरेगावकर झालो आहे.
 
 

 
 
 
हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर उपेंद्रने दाक्षिणात्य चित्रपटांतूनदेखील भूमिका केलेल्या आहेत. मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काय फरक जाणवतो या प्रश्नावर उपेंद्रने दिलेले उत्तर खूपच मार्मिक आहे. उपेंद्र म्हणतो, आपल्याकडे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत असे आपण मानतो. मात्र दक्षिणेत अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच सिनेमा हीदेखील त्यांची मूलभूत गरज असल्याचे दिसून येते. कारण, दिवसाला शंभर रूपये कमावणारी व्यक्ती त्यातले वीस रूपये चित्रपट पाहण्यासाठी राखून ठेवते. चित्रपट पाहण्यासाठी देवळात जावे तसे नेमाने ती माणसं चित्रपटागृहात जाऊन चित्रपट बघत असतात आणि म्हणूनच बहुदा तिथे कलाकाराला देवासारखे मानले जाते. एकेकाळी आपल्या देशात बंगाली चित्रपटांची सद्दी असायची. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची सद्दी होती. आता मात्र ‘श्वास’नंतर विभागीय चित्रपटांच्या श्रेणीत देशपातळीवर मराठी चित्रपटांची सद्दी सुरू झालीय, असे म्हणण्यास हरकत नाही. उपेंद्रशी सुमारे तासभर मारलेल्या गप्पांमधून बॉलीवूडच्या आसमंतात दिमाखाने तळपणाऱ्या या तार्यापचे पाय अद्यापही जमिनीवरच घट्टपणे रोवले असल्याचे दिसले. चंदेरी दुनियेतील काही फक्त star असतात तर काही अस्सल कलाकार असतात. पण, स्वभावाने अत्यंत विनयशील आणि दोस्तांचा दोस्त असलेला उपेंद्र खऱ्या अर्थाने स्टार, यार, कलाकार आहे.”

 
 

 
 
“महेश पावसकर,”
“संपादक, गोरेगाव मिरर”
mirrorgoregaon@gmail.com
 
 
““कुछ पलों की तालीयों की गूंज जिंदगी का सन्नाटा खत्म नही कर सकती”. परिस्थितीने गांजलेल्या एकेकाळच्या अवॉर्ड विजेत्या कथ्थक डान्सरच्या तोंडचा हा डायलॉग त्याच्या पत्नीला कलाकाराच्या आयुष्याच्या खडतर वास्तवाची जाणीव करून देतो आणि टीव्हीच्या पडद्यावर हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या काळजालादेखील चटका बसतो. याच आठवड्यात सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सुरू झालेल्या ‘तारा फ्रॉम सातारा’ या टीव्ही मालिकेतला हा सीन राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या अभिनेत्याने, उपेंद्र लिमयेने अक्षरशः जिवंत केला आहे. ‘मुक्ता’, ‘बनगरवाडी’, ‘सरकारनामा’, `ध्यासपर्व’, `सिंधुताई सपकाळ’ ‘येलो’,`ढग’,`तुह्या धर्म कोंचा’, ‘सुर सपाटा’,`पेज थ्री’, ‘चांदनी बार’,`ट्रॅफिक सिग्नल’ आणि ‘मुळशी पॅटर्न’सारख्या मराठी व हिंदी चित्रपटांतून आपल्या कसदार अभिनयाने मिळालेल्या व्यक्तिरेखांचं सोनं करणारा कलाकार उपेंद्र लिमये म्हणजे बॉलिवूडला लाभलेला एक ‘परीस’ आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.”
 
 
“जन्माने पुणेकर असलेल्या उपेंद्रला शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. अभ्यासापेक्षा अभिनयाच्या/कलेच्या क्षेत्रात रस असलेल्या उपेंद्रला त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की, तुला ज्या क्षेत्रात जायचंय, त्या क्षेत्रात जा. पण, जाशील तेथे ‘top’ला जा. आज २५ वर्षानंतर अभिनयाच्या क्षेत्रात उपेंद्रने जी उंची गाठली आहे, ती पाहता वडिलांचे शब्द त्याने प्रत्यक्षात खरे करून दाखविले असेच म्हणावे लागेल. ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळ्या उपेंद्रने हिंदी टीव्ही मालिकांच्या जगात दमदार पदार्पण केले आहे. साताऱ्यात राहणाऱ्या आणि आयुष्यभर कलेवर निष्ठा ठेवणार्याग ‘सचिन माने’ नामक कत्थक डान्सरला एका विशिष्ट परिस्थितीमुळे सातारा सोडून मुंबई गाठावी लागते. `हीप-होप’ व पाश्चिमात्य नृत्याचा झगमगाट असलेल्या मुंबईच्या ‘कल्चर’बद्दल त्याला मनस्वी तिटकारा असतो. पण याच कल्चरची आणि नृत्यकलेची आवड असलेल्या त्याच्या स्वतःच्या मुलीबरोबर त्याचा होणारा संघर्ष हे या मालिकेचे कथाबीज आहे. ‘रियालिटी शो’ आणि ड्रामा यांचे अनोखे ‘fusion’ असलेली ही मालिका आहे, ज्यात बाप आणि मुलीच्या नातेसंबंधातील हळुवार भावविश्व दिग्दर्शकाने अचूक टिपलेले आहे.”
 
 
“या मालिकेबाबत बोलताना उपेंद्र सांगतो की, नाट्य, चित्रपट आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांपैकी टीव्ही हे माध्यम सर्वात जास्त शक्तिशाली आहे. कारण, ते घरातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला थेट भिडत असतं. २००८ ते २०१६ अशी सुमारे आठ वर्षं ठरवून टीव्ही मालिका न करणाऱ्या उपेंद्रला ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेच्या कथानकाने मोहिनी घातली. एक जबरदस्त नाट्य आणि ज्यात अभिनेत्याचा कस लागेल असे कंटेंट या मालिकेत असल्यानेच आपण हिंदी मालिका विश्वात एंट्री घेण्याचा निर्णय घेतल्याचे उपेंद्र सांगतो. पदार्पणातच जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन लाभलेला ‘मुक्ता’ हा चित्रपट उपेंद्रला मिळाला आणि त्यानंतर अमोल पालेकर, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, सतीश राजवाडे, अनंत महादेवन, मधुर भांडारकर व राम गोपाल वर्मा यासारख्या एकापेक्षा एक दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटातून उपेन्द्रला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला मिळाल्या. राजीव पाटील दिग्दर्शित ‘जोगवा’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. या चित्रपटातील त्याचा भूमिकेला ‘फोर्ब्स’ च्या यादीमध्ये 25 Greatest Acting Performances of Indian Cinema म्हणून गौरविले गेले आणि अवघ्या बॉलिवूडचे लक्ष या अभिनेत्याकडे वेधले गेले.”
 
 
“केवळ वास्तववादी चित्रपटातच काम करणे इथवर न थांबता ‘बदाम राणी गुलाम चोर’ ‘शेंटिमेंटल’ यासारख्या विनोदी चित्रपटातूनदेखील वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून उपेंद्रने त्याच्या अभिनयातील चतुरस्त्रपणाचे दर्शन घडविले आहे. सुमारे १७ वर्षांपासून गोरेगावात राहणाऱ्या उपेंद्र लिमयेला गोरेगाव एवढे प्रिय का आहे, असे विचारले असता तो सांगतो की, तो माझा ‘स्ट्रगल’चा काळ होता. गोरेगावमधल्या नागरी निवारा परिषदेत मी भाड्याच्या घरात ‘वन रूम किचन’मध्ये राहयचो. मुंबईत यापेक्षा स्वस्त आणि प्रशस्त असे ‘वन रूम किचन’चे घर कुठेही नसल्याने व सर्व दृष्टीने सोयीस्कर असलेले गोरेगाव निवडले. इथली ‘नागरी निवारा परिषद’ वसाहतीतील माणसं खूप प्रेमळ आहेत. इथे जणू ‘मिनी कोकण’च वसलेलं आहे. सर्व मराठमोळे सण आणि उत्सव येथे अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. इथली ‘रत्नागिरी’ ‘समाधान’ ही हॉटेल्स खवय्यांना तृप्त करतात. गोरेगाव स्टेशनजवळचे ‘सत्कार हॉटेल’ ‘दत्तप्रसाद स्नॅक्स’ यांनी मराठमोळी संस्कृती येथे टिकवली आहे. २००९मध्ये मी ‘नागरी निवारा परिषद’मधील ‘वन रूम किचन’मधून ‘न्यू म्हाडा कॉलनी’मधील ‘टू बीएचके’मध्ये शिफ्ट झालो ते केवळ याच परिसरात राहयला मिळावे म्हणून. माझी पत्नी ‘स्वाती’, ही व्यवसायाने डॉक्टर आहे. याच परिसरात तिचे क्लीनिकदेखील आहे. मुलगी ‘भैरवी’ एका प्रोडक्शन हाऊसमध्ये नुकतीच जॉईन झालीय तर मुलगा ’वेध’ नववीमध्ये शिकत आहे. एकंदरीत मी जन्माने जरी पुणेकर असलो तरी आता मात्र पुरता गोरेगावकर झालो आहे.”
 
 

 
 
 
“हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर उपेंद्रने दाक्षिणात्य चित्रपटांतूनदेखील भूमिका केलेल्या आहेत. मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काय फरक जाणवतो या प्रश्नावर उपेंद्रने दिलेले उत्तर खूपच मार्मिक आहे. उपेंद्र म्हणतो, आपल्याकडे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत असे आपण मानतो. मात्र दक्षिणेत अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच सिनेमा हीदेखील त्यांची मूलभूत गरज असल्याचे दिसून येते. कारण, दिवसाला शंभर रूपये कमावणारी व्यक्ती त्यातले वीस रूपये चित्रपट पाहण्यासाठी राखून ठेवते. चित्रपट पाहण्यासाठी देवळात जावे तसे नेमाने ती माणसं चित्रपटागृहात जाऊन चित्रपट बघत असतात आणि म्हणूनच बहुदा तिथे कलाकाराला देवासारखे मानले जाते. एकेकाळी आपल्या देशात बंगाली चित्रपटांची सद्दी असायची. त्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची सद्दी होती. आता मात्र ‘श्वास’नंतर विभागीय चित्रपटांच्या श्रेणीत देशपातळीवर मराठी चित्रपटांची सद्दी सुरू झालीय, असे म्हणण्यास हरकत नाही. उपेंद्रशी सुमारे तासभर मारलेल्या गप्पांमधून बॉलीवूडच्या आसमंतात दिमाखाने तळपणाऱ्या या तार्यापचे पाय अद्यापही जमिनीवरच घट्टपणे रोवले असल्याचे दिसले. चंदेरी दुनियेतील काही फक्त star असतात तर काही अस्सल कलाकार असतात. पण, स्वभावाने अत्यंत विनयशील आणि दोस्तांचा दोस्त असलेला उपेंद्र खऱ्या अर्थाने स्टार, यार, कलाकार आहे.”

Continue reading

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...
Skip to content