HomeArchiveभाजपमधील नकोशी `मुले'

भाजपमधील नकोशी `मुले’

Details
भाजपमधील नकोशी `मुले’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
खूप वर्षांपूर्वी एका डॉक्टरने आम्हाला सांगितले होते की, `घरातील म्हातारा माणूस म्हणजे अनवॉण्टेड चाईल्ड (नको असलेले मूल) असते. सर्वच घरात लहान मूल हवेहवेसे वाटते. त्यांचे लाड केले जातात. पण म्हातारा माणूस जेव्हा अडगळीत पडतो तेव्हा त्याचे रूपांतर अनवॉण्टेड चाईल्डमध्ये होते. आज भारतीय जनता पक्षातील वयोवृद्ध नेत्यांची अवस्था नकोशा झालेल्या मुलांप्रमाणे झाली आहे. सर्वप्रथम लालकृष्ण अडवाणी यांना दूर केले गेले. 91 वर्षे वय असलेले लालकृष्ण अडवाणी आजही धडधाकट आहेत. पुढील पाच वर्षे त्यांची प्रकृती उत्तम राहील असे त्यांच्याकडे पाहून वाटते. पण काही दिवसांपूर्वी अमित शाह यांनी त्यांना औपचारिकता म्हणून निवडणूक लढविणार का?, असे विचारले. त्यावर अडवाणी यांनी नकार देताच पडत्या फळाची आज्ञा मानून अमित शाह तेथून बाहेर पडले. आता तेच अमित शाह अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत.

भाजपात 75 वर्षांवरील व्यक्तीला तिकीट द्यायची नाही, असे ठरवून बुजूर्ग नेत्यांची पद्धतशीरपणे गोची केली गेली. अडवाणी यांचा काटा दूर केल्यानंतर डॉ. मुरली मनोहर जोशी यांनादेखील भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी कानपूरमध्ये सत्यदेव पच्चौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपण निवडणूक लढविणार नसल्याचे डॉ. जोशी यांनी समर्थकांना पत्र लिहून जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांची धावपळ उडाली. डॉ. जोशी यांच्या नाराजीमुळे उत्तर प्रदेशात भाजपला ब्राह्मण मतांचा फटका बसण्याचे संकट निर्माण झाले. त्यावर मात करण्यासाठी मग भाजपने सावध पवित्रा घेत मनेका व वरूण गांधी यांच्यासह अनेकांचे मतदारसंघ बदलले. डॉ. जोशी यांच्याप्रमाणेच कलराज मिश्रा, करिया मुंडा, शांताकुमार या पंचाहत्तरी पार केलेल्या उमेदवारांना तिकीट नाकारून भाजपने बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

सारांश, म्हातारे माणूस म्हणजे अनवॉण्टेड चाईल्ड असल्याचे भाजपने मान्य केले आहे. म्हणूनच आपल्या घरातील या नकोशा झालेल्या `मुलां’ना भाजपने दूर लोटले आहे. वास्तविक 1978 साली जनता पक्ष सत्तेवर आला तेव्हा पूर्वीचा जनसंघ हा त्या पक्षाचा एक भाग होता. त्या पक्षाकडून पंतप्रधान झालेले ज्येष्ठ नेते मोरारजी देसाई हे 83 वर्षांचे होते. पण त्या वयातही ते धडधाकट होते. देश चालविण्यास समर्थ होते. पुढे 99 वर्षे वय झाल्यावर मोरारजीभाईंचे निधन झाले. पण अखेरपर्यंत ते चालते-फिरते राहिले. त्यांची स्मरणशक्ती ठणठणीत राहिली.

सांगण्याचे तात्पर्य असे की, वय झाले म्हणून एखादी व्यक्ती अडगळीत टाकण्याइतकी निरूपयोगी ठरत नाही. किंबहुना, त्या व्यक्तीचा अनुभव हा पक्षासाठी अथवा देशासाठी लाभदायक ठरू शकतो. तरूण उत्साह आणि म्हातारा अनुभव यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. पण हे दोन्ही एकत्र झाले तर त्यातून खूप काही चांगले निर्माण होऊ शकते. शेवटी वय वाढणे हा निसर्गाचा नियम आहे. तो कोणीही रोखू शकत नाही. पण वाढत्या वयाच्या नावाखाली वयोवृद्ध लोकांना दूर लोटून त्यांना मनस्ताप देणे, हे उलट्या काळजाच्या माणसांचे लक्षण आहे. भाजपच्या प्रमुखपदी अशी माणसे असावीत हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content