HomeArchiveभाजपातील परिवर्तन!

भाजपातील परिवर्तन!

Details
भाजपातील परिवर्तन!

    01-Apr-2019

| 1

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
aniketsjoshi@hotmail.com
अटलबिहारी वाजपेयींचे निधन झाले आणि लालकृष्ण अडवाणी यांना ज्येष्ठ पदाचा मान देऊन घरी बसवले. भारतीय जनता पक्षामधील पिढीचे परिवर्तन यामुळे पूर्ण झाले. अमfत शाहंनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा जो मोठा रोड शो झाला आणि जी विशाल सभा रणरणत्या उन्हात पार पडली त्यामधून हाच संदेश देण्यात आला आहे की भाजपामध्ये आता शाह आणि मोदींचे युग सुरू झाले आहे. वाजपेयी, अडवाणींचा जमाना आता सरला आहे. तसे हे दोन्ही नेते पाच वर्षांपूर्वीच शांत झाले होते, हळूहळू पडद्याआड निघालेच होते. वाजपेयींच्या तब्ब्येतीमुळे ते सार्वजनिक जीवनामधून 2010 नंतर दिसेनासे झालेच होते. त्यांच्या निधनानंतर तर त्या युगाचाच अस्त झाला. आता सार्वजनिक जीवनातील अडवाणींचा अस्तही दिसू लागला आहे.

वयाची 91 वर्षे गाठणाऱ्या पण अद्याप ताठ व तल्लख असणाऱ्या लालजी अडवाणी यांची इच्छा तर सतराव्या लोकसभेमध्येही दाखल व्हावे अशीच होती. संसदेतील सातत्यपूर्ण सहभागाचा कदाचित मोठा जागतिक स्तरावरचा विक्रम त्यामुळे प्रस्थापित झाला असता. त्यांनी ही इच्छा, महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नव्हती. पण त्यांचे निकटवर्ती सहकारी यावेळी साथ देत नव्हते. अडवाणीजींना पक्षाने किती अधिक त्रास द्यावा असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते. अडवाणींना प्राणप्रिय असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघही त्यांच्या पाठीशी राहिला नाही. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्यांना मंत्रीपदे द्यायची नाहीत या चलाख अटीमुळे 2014च्या निवडणुकीनंतर अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशा बड्या बुजूर्गांना पक्षाने बाजूला ठेवले होते. पोकळ वलयांकित मार्गदर्शक मंडळात त्यांना ढकलले गेले तेव्हाच अडवाणीयुगाचा अस्त दिसू लागला होता.

ससंदेत अडवाणी हे तरूणांना लाजवतील अशा उत्साहाने रोज हजर राहत होते. पण त्यांचा आवाज, त्याचा कामकाजातील सहभाग काही देशाच्या नजरेत पडला नाही, कानांवरही पडला नाही. अधुनमधून ब्लॉगच्या माध्यमांतून ते व्यक्त होत राहिले पण ते तितकंच. गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर एखादे भाषण केले नाही. त्यांचा ठसा नेहमीच्या शैलीत उमटेल असे कोणतेही कामकाज सोळाव्या लोकसभेत अडवाणींच्या नावे जमा झालेच नाही. लालकृष्ण अडवणी यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी येण्याची एक संधी होती. मोदी व संघ नक्कीच ती संधी साधतील अशी अपेक्षा देशात सर्वत्र होती. पण अडवाणींच्या त्या महत्त्वाकांक्षेच्या आड पुन्हा श्रीरामच आले! अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा तिथे जी सभा सुरू होती त्याचे नेतृत्त्व अडवाणींचे होते. रामजन्मभूमी आंदोलनाशी अडवाणींचा अधिक घनिष्ठ संबंध होता. गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून त्यांनी अयोध्येपर्यंत रथयात्रा काढली होती. त्यातून देशभरात आंदोलनाचा अंगार फुलला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुलायम सिंह सरकारने 1991-92 मध्ये फैजाबादेत जो खटला दाखल केला होता, मशीद पाडण्याबद्द्लचा, तो खटला अद्याप सुरूच आहे. त्यात सीबीआयने पुढे तपास केला. त्याचे प्रकरण ऐन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच पुन्हा पुढे आले व अडवाणींचे नाव राष्ट्रपतीपदासाठी मागे पडले.

मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिरणारे रामनाथ कोविंद हे आधी बिहारचे राज्यपाल झाले व अचानक थेट राष्ट्रपती निवडणुकीतही विजयी ठरले. या पदाचे भजापातील एकमेव हक्कदार मानले गेलेले अडवाणी मात्र होते तिथे तसेच राहिले. आता त्यांच्या नावाचा विचार सतराव्या लोकसभा उमेदवारांच्या यादीसाठी झालाच नाही. 1991 पासून अडवाणी हे सातत्याने याच गांधीनंगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत करत होते. पाच-सहा वेळा अडवाणी गांधीनगर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले आहेत. फक्त 1996 मध्ये ते इथले खासदार नव्हते. तेव्हा ती जागा अटल बिहारी वाजपेयींनी लढवली होती. वाजपेयी हे लखनौ व गांधीनंगर अशा दोन्ही ठिकाणी विजयी झाले. त्यांनी लखनौची खासदारकी ठेवली. 1989 पासून भाजपने कधीही गांधीनगर मतदारसंघात पराभव पत्करला नाही. अडवाणी हेच सध्याचे गांधीनगरचे मावळते खासदारही आहेत. पण अमित शाहंच्या नावावार पक्षाने या जागेसाठी शिक्कामोर्तब केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अतिशय विश्वासातील नेते व गांधीनंगर लोकसभा मतदारसंघातलीच माजी आमदार राहिलेले शाह यांना ही हमखास विजयी हणारी जागा पक्षाने दिली.

भारतीय जनता पक्षात आता अमित शाह हे मोदींचे विश्वासू. इतकेच नाहीत तर त्यांनी स्वतःचेही नेतृत्त्व व्यवस्थित स्थापित केले आहे. निवडणुका जिंकण्याचे त्यांचे तंत्र देशात सर्वत्र चर्चेचा विषय झाले. एक बूथ, दस युथ ही संकल्पना घेऊन त्यांनी भाजापची जी बांधणी पुन्हा नव्याने केली आहे त्यालाही तोड नाही. मोदींची प्रतिभाशाली भाषणे, मोदींच्या कामाचा झपाटा व योजनांचा भडिमार यांच्या जोडीला शाहंचे निवडणुकांचे नियोजन व संयोजन यंत्रणेची उभारणी व यंत्रणेची राबवणूक या साऱ्या गोष्टी भाजपला यश देत आहेत. एक निवडणूक संपते व विविध राजकीय पक्षाचे नेते हुश्श करून बसतात, निवांत होतात, परदेशात फिरायला जातात तेव्हा अमित शाह पुढच्या निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करतात. उत्तर प्रदेशात त्यांनी तुफान विजय मिळवला तेव्हा ते कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे अभिनंदन घेण्यासाठी दिल्लीत थांबले नव्हते तर ते केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक अशा राज्यांमध्ये पुढच्या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी पोहोचले होते. अमितभाईंच्या या गुणांचा, या कष्ट करण्याच्या तयारीचा प्रभाव भाजपात पडला होताच, तो आता वाढलेला आहे.

गुजरातमधील एक माजी राज्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या विश्वासातील गुजराती नेता ही त्यांची प्रतिमा 2012-13 मध्ये होती. 2019च्या निवडणुकीचे नेतृत्त्व पुढे होऊन करताना अमित शाह हे मोदींच्या इतकेच महत्त्वाचे असे स्वतंत्र नेतृत्त्व बनले आहे हे विशेष. कालच्या गुजरातमधील तुफानी दणकेबाज शोनंतर मोदी-शाहंचे युग भाजपमध्ये सर्वार्थाने सुरू झाल्याचा संदेशही देण्यात आला आहे. बेंगळुरूमध्ये कर्नाटकातील सत्तेचा भाजपच्या तोंडचा घास पळवल्यानंतर साऱ्या भाजप व मोदीविरोधी नेत्यांनी हातत हात घालून एक संदेश देशाला दिला होता की शाह-मोदींना पराभूत करण्याची ताकद विरोधकांच्या ऐक्यात आहे. तोच संदेश लखनौ व कोलकाता येथूनही काही महिन्यांनी विरोधकांनी दिला. फण त्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वाचे पंख कापणारे राजकारण दडलेले होते. ज्या मायवतींनी बेंगळुरूमध्ये सोनिया गांधींना मागच्या बाजूने पुढे खेचत स्वतःच्या व ममता बॅनर्जींच्या मध्ये खेचले व फोटोत मध्ये आणले अशी दृष्ये तेव्हा तुफान गाजली होती, त्याच मायवतींनी सोनिया आणि राहुल गांधींना लाथ मारत विरोधकांच्या ऐक्याची तिसरी फळी उभी केली. तिकडे चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे टी. आर. एस. यांनी पुन्हा चौथी फळी उभी करण्याचे काम केले. विरोधकांच्या त्या बेंगळुरूत दिसलेल्या स्वप्नवत ऐक्याच्या चिरफळ्या अशा उडत असताना अहमदाबाद व गांधीनगरमध्ये अमित शाहंच्या अर्ज दाखल करण्याच्या समारंभाचे निमित्त करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे, एनडीएचे सामर्थ्य जनतेला दिसेल अशी व्यवस्था भाजपने केली व विरोधकांवर एक कडी करून दाखवली. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत भाजपला, मोदींना व शाहंनाही उघड शिव्या घालणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही गुजरातेत जाऊन शाहंच्या मिठीत सामावावे असे वाटावे यातच एनडीएने मोठी प्रचाराची बाजी मारलेली दिसते.”
 

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content