HomeArchiveआदित्य ठाकरे यांची...

आदित्य ठाकरे यांची ‘तीर्थयात्रा’

Details
आदित्य ठाकरे यांची ‘तीर्थयात्रा’

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पिताश्री, थोर समाजसुधारक प्रबोधनकार, केशव सीताराम ठाकरे यांनी बाळासाहेबांना एक सल्ला दिला होता, `निवडणूक कधीही लढवू नकोस.’ बाळासाहेबांनी आपल्या पित्याचा हा सल्ला अखेरपर्यंत भक्तीभावाने स्वीकारला. ते कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. त्यांनी सामान्यातील सामान्य माणसाला नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री केले. पण स्वत: मात्र निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहिले. सत्तेच्या खुर्चीपासून अलिप्त राहिले. पण त्यामुळे त्यांचे महत्त्व कमी झाले नाही. किंबहुना, ते सदैव वाढतच गेले. बाळासाहेब स्वत: व्यंगचित्रकार होते, पत्रकार होते. पण, शिवसेना स्थापन झाल्यापासून त्यांचे आणि पत्रकारांचे विळ्या-भोपळ्याचे नाते निर्माण झाले. बाळासाहेबांनी आपल्या जाहीर भाषणातून आणि `मार्मिक’ व `सामना’ या मुखपत्रांतून शिवसेनेवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर कठोर टीका केली. पण सर्वाधिक पत्रकारांना संसदेत पाठविण्याचे काम बाळासाहेबांनीच केले. त्याबद्दल पत्रकारांच्या वतीने त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.

बाळासाहेबांप्रमाणेच आपल्या आजोबांचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील मानला. तेदेखील कधी निवडणूक लढविण्याच्या भानगडीत पडले नाहीत. परिणामी, दोघांनीही समाजात आपआपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले. आता ठाकरे यांची चौथी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे 29 वर्षीय चिरंजीव आदित्य ठाकरे पाच दिवसांच्या राज्याच्या जनआशीर्वाद यात्रेवर निघाले आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही जनआशीर्वाद यात्रा आहे. तथापि, आपल्यासाठी ती `तीर्थयात्रा’ असल्याचे आदित्य यांचे म्हणणे आहे. या यात्रेतून आदित्य ठाकरे काय साधणार आहेत? अर्थात, ते शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

असाच प्रयत्न आदित्य यांचे काका राज ठाकरे यांनी सुमारे 22 वर्षांपूर्वी केला होता. युती शासन सत्तेत येण्याआधी राज ठाकरेदेखील आपल्या तरूण सहकाऱ्यांसह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेले होते. शिवसेनेचे संघटन मजबूत करण्याचे काम राज यांनी तेव्हा केले होते. आज आदित्य ठाकरे तेच करत आहेत. मात्र राज आणि आदित्य यांच्या या यात्रेत एक मोठा फरक आहे. राज यांच्या डोक्यात त्यावेळी निवडणूक लढविण्याचा विचारदेखील नव्हता. पण आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत. तसे स्वप्न पाहण्यात काही गैरदेखील नाही. लोकशाहीत लोकांनी तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला निवडून दिले तर मुख्यमंत्री होणे हा तुमचा अधिकारच आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, `मी निवडणूक लढवावी असे लोकांना वाटत असेल तर मी त्यासाठी तयार आहे.’ या एका वाक्यात आदित्य यांच्या तीर्थयात्रेचे मूळ स्पष्ट होते. सारांश, ठाकरे यांच्या, प्रबोधनकारांपासून, तीन पिढ्या निवडणुकांपासून दूर राहिल्या. पण, आदित्य ठाकरे यांच्या रूपात चौथी पिढी मात्र निवडणूक लढविण्यास सज्ज आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमितदेखील भविष्यात निवडणूक लढवू शकतील. हे दोन्ही ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर ते निश्चित विजयी होतील. त्यांच्या पणजोबांची आणि आजोबांची पुण्याई त्यांच्या कामी येईल. शेवटी समाजासाठी काही करायचे असेल तर सत्ता हे मोठे माध्यम आहे. हाती सत्ता आली तर खूप काही करता येते. त्यादृष्टीने सत्तेच्या राजकारणात, निवडणुकीच्या माध्यमातून, उतरण्याचा आदित्य ठाकरे यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यांच्या `तीर्थयात्रे’स आमच्या शुभेच्छा!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content