HomeArchiveगटबाजीने पोखरलेली काँग्रेस...

गटबाजीने पोखरलेली काँग्रेस पराभवातून सावरेल?

Details
गटबाजीने पोखरलेली काँग्रेस पराभवातून सावरेल?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनोद साळवी, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचा सुफडासाफ झाल्यानंतरही पक्षांतर्गत गटबाजी, कुरघोड्या सुरूच आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्यासाठी राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्नही विफल होत असल्याने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आणखीनच वाढत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत संजय निरूपम यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील दुफळीचे दर्शन घडले होते. त्यांच्या जागेवर मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी लागलीच नियुक्तीही झाली. परंतु राहुल ब्रिगेडचे कडवे समर्थक मानले जाणारे मिलिंद देवरा यांनीही मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहवेत, यासाठी देवरा यांचा हा पदत्याग असल्याचे बोललेले जाते.

दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सामूहिक जबाबदारी म्हणून देवरा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायऊतार झाल्याचेही बोलले जाते. मात्र, संजय निरूपम यांनी देवरा यांच्यावर थेट निशाणा साधून ‘देवरा यांचा हा राजीनामा म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सरकण्यासाठी खेळलेली खेळी आहे’, असे म्हटले आहे. यामध्ये त्याग कमी आणि स्वार्थी भावना अधिक दडलेली आहे. पक्षाने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. यावरून मुंबई काँग्रेसमध्ये पूर्वापार चालत आलेल्या अंतर्गत गृह्कलहाची परंपरा आणि इतिहास आगामी विधानसभा निवडणुकीत तरी खंडित होईल, याचे समाधानकारक उत्तर मिळताना दिसत नाही.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत एकही जागा जिंकता आली नाही. राज्यातही केवळ एकच जागा जिंकता आली. मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई अशा सहाच्या सहा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा शिवसेना-भाजप युतीने दारूण पराभव केला. त्यानंतरही मुंबईत काँग्रेसला लागलेल्या गटबाजीचे ग्रहण अजून सुटलेले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईतील सहाच्या सहा जागांवर पराभवाचे पाणी चाखावे लागले. यामध्ये दक्षिण मुंबईत कॉंग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा सुमारे १ लाख मतांच्या फरकाने शिवसेना-भाजप युतीच्या अरविंद सावंत यांनी पराभव केला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा उत्तर मुंबईतून शिवसेना-भाजप युतीच्या गोपाळ शेट्टी यांनी सुमारे ४ लाख ५३ हजार मतांनी पराभव केला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कामेच केली नाहीत, असा लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. उर्मिला यांचा संपूर्ण रोख हा उत्तर मुंबईत सक्रीय असलेल्या संजय निरूपम गटावर होता. मात्र यानंतरही काँग्रेस गांभीर्याने पराभवाचे चिंतन करते आहे का, हे मुंबई काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या बेदिलीवरून तरी दिसत नाही.

उत्तर-मध्य मुंबईतही २०१४च्या विजयाची पुनरावृती करून भाजप-शिवसेना युतीच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १ लाख २४ हजार मतांनी पराभव केला. उत्तर-पूर्व मुंबईत युतीच्या मनोज कोटक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या संजय दिना पाटील यांचा दणकून पराभव केला. उत्तर-पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसच्या संजय निरूपम यांचा २ लाख मतांनी पराभव केला होता. दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेना-भाजप युतीच्या राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा प्रचंड मतांच्या फरकाने पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीनंतरही गाफील राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला २०१९ मध्येही सहाच्या सहा जागा गमवाव्या लागल्या आहेत. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतरही काँग्रेस वेगळ्याच संभ्रमावस्थेतून जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीची हवा होती. आजही तिचा जोर ओसरलेला नाही. याच ‘वंचित’ फॅक्टरचा मोठा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लोकसभेला बसला. निवडणूक आयोगाने मांडलेली एकूण मतांची गोळाबेरीज हेच दर्शवते आहे. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघ येतात. त्यातील प्रत्येक मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यातील अनेक मतदारसंघात ‘वंचित’च्या पारड्यात मोठ्या प्रमाणावर आणि निर्णायक मते पडल्याने लोकसभेचे निकाल धक्कादायक होते. त्यामुळे येत्या ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’ला सोबत न घेतल्यास आघाडीला त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची पारंपारिक व्होटबँक असलेली दलित आणि मुस्लीम मते भिवंडी पूर्व व पश्चिम, मानखूर्द, वांद्रे पूर्व, मुंबादेवी मालेगाव आदी मतदारसंघात विभागली गेली. फक्त आदिवासीबहुल नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या हिना गावित यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांचा पराभव केला. पाडवी यांनी अक्कलकुवा, नावापूर आणि साक्री मतदारसंघात मताधिक्य मिळवले होते. वंचित बहुजनच्या इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेत शिवसेनेच्या विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. हा वंचित फॅक्टर सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, बुलढाणा, बाळापूर, अकोला [प.], ब्रम्हपुरी, चिमूर, गडचिरोली, नायगाव, देगलुर [नांदेड], गंगाखेड, जिंतूर, परभणी असा चालला. येथे वंचित बहुजनच्या उमेदवाराला २५ हजार मते पडली होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २८८ पैकी ५४ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी होती. तसे पाहता कांग्रेस-राष्ट्रवादीची २८८ विधासभा मतदारसंघापैकी ८३ जागांवर पकड आहे. हे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत कितपत बदलेले दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”
 
“विनोद साळवी, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content