Details
राजकीय वनवास असह्य झाल्यानेच सचिन अहिर शिवसेनेत!
01-Jul-2019
”
विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
राज्य विधानसभा निवडणूक जवळ येत असताना बदलती हवा पाहून पक्षांतरांची स्पर्धाही वाढत आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांवरील निष्ठा गळून पडत आहेत. ताजे प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटचे शिलेदार, कामगार नेते सचिन अहिर यांनी एका रात्रीत `मातोश्री‘वर जाऊन हातावरचे घड्याळ फेकून देत त्याजागी भगवे शिवबंधन बांधून घेतले. हातात भगवा झेंडा घेतला. अहिरांच्या या पक्षप्रवेशाची जराही कुणकुण नव्हती. सचिन अहिर `मातोश्री’च्या प्रेमात पडले आणि एक नवा राजकीय प्रवास त्यांनी सुरू केला आहे. काय आहेत त्यांच्या या परिवर्तनाची कारणे?
सचिन अहिर हे कामगार चळवळीतून आलेले नेतृत्त्व आहे. मुंबईत भायखळ्याच्या खटाव मिलमध्ये ते कामगार होते. त्या मिलमध्ये कामगारांचे त्यांनी नेतृत्त्व केले. १९९६ च्या सुमारास ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष झाले. १९९९ शरद पवारांनी काँग्रेसला रामराम ठोकत स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यावेळी अहिर यांनी पवारांची साथ धरली. तेव्हापासून ते पवारांचे निकटवर्तीय म्हणून वावरू लागले. आघाडीची सत्ता आली तेव्हा तेव्हा दोन वेळा त्यांनी मुंबई म्हाडाचे सभापतीपद दोन वेळा भूषविले. सलग तीन वेळा ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. सात विविध विभागांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. गेली २५ वर्षे अहिर राजकारणात आणि कामगार चळवळीत सक्रीय असून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण केला आहे. असा तयार कार्यकर्ता आपल्या पक्षात असावा, असे राजकीय नेत्यांना वाटणारच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईचे अध्यक्षपद त्यांनी तीनदा भूषविले. मात्र, पक्षाची ताकद त्यांना वाढवता आली नाही, हेही तितकेच वास्तव आहे. पक्षाची बांधणी करण्यात ते कमी पडले.
कामगार चळवळीतून आले तरी सचिन अहिर यांचा स्वभाव आक्रमक नाही. ते नम्र स्वभावाचे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेते आहेत. पवार यांच्या विश्वासातील असल्यानेच त्यांना मिल मजदूर संघाचे स्वतंत्र संस्थान मिळाले. हरिभाऊ नाईक, नरेंद्र तिडके, मामा फाळके अशा नेत्यांनी रा. मि. म. संघाचे नेतृत्त्व केले होते. शंकरराव जाधव यांचा पराभव करून अहिर यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. ती निवडणूक अतिशय गाजली होती. कारण अरूण गवळी यांच्याशी अहिर यांचे नातेसंबंध होते. काँग३सला आव्हान देत अहिर यांनी संघावर झेंडा फडकविला. त्यावेळी त्यांचे वय केवळ २५ वर्षांच्या आसपास होते.
आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा वरळी मतदारसंघ शिवसेनेने काबीज केला. आणि ते राजकीय विजनवासात गेले. पुढील निवडणूकही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जिंकू शकत नाही हे उघड भाकीत आहे. विरोधी पक्षांत बसण्याची मानसिकता आजकालच्या राज्यकर्त्यांमध्ये नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे भले भले नेते भाजप, शिवसेनेच्या तंबूत जात आहेत. सचिन अहिर हे तरूण नेतृत्त्व आहे. त्यांना राजकीय करियर अद्याप घडवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून `मातोश्री’शी घरोबा केला आहे. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेचे किती भले होईल ते काळच ठरवेल. मात्र, अहिर यांचे नक्कीच भले होईल. शिवसेना त्यांची काळजी घेईल. ते उद्या सत्तेत असतीलच. राजकीय वनवासातून ते बाहेर येतील. त्यासाठीच त्यांनी हातावरचे घड्याळ फेकून शिवबंधन बांधून घेतले आहे.”
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार