HomeArchiveस्पा सेंटर ठरत...

स्पा सेंटर ठरत आहेत देहव्यापाराचे अड्डे!

Details
स्पा सेंटर ठरत आहेत देहव्यापाराचे अड्डे!

    05-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 
 

 
 
 
जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार
Jagdish.bhovad@gmail.com
 
मागील पंधरा दिवसांत आलेल्या या बातम्यांनी मुंबईसारख्या औद्योगिक आणि आर्थिक राजधानीमध्ये खळबळ माजवली आहे. मुंबईत नेमके काय सुरू आहे, सरकारने कितीही कायदे केले, तरीही पैशांच्या हव्यासाने विविध क्लृप्त्या लढवणारे लढवणारच हेच यातून दिसून येत आहे. तरूण पिढी बरबाद होते, म्हणून मध्यंतरी सरकारने कडक कायदे केले. डान्सबारवर बंदी घातली. त्यानंतर डान्सबार तसेच खुलेआम देहव्रिकय व्यवसाय चालविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. त्यानंतर या व्यवसायातील दलालांची आर्थिक कमाई बंद झाली. मात्र त्यातूनही काहीतरी मार्ग काढीत या महाभागांनी चक्क स्पा आणि मसाज सेंटरचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे.
मुंबईमध्ये, विशेषकरून उच्चभ्रू वस्तींमध्ये स्पा आणि मसाज सेंटरचा अलीकडच्या काळात सुळसुळाट झालेला आहे. या स्पा आणि मसाज सेंटरमध्ये बहुतांशी बारबालांना कामाला ठेवण्यात येऊ लागले असून त्यांच्याकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अशाच स्पा आणि मसाज सेंटरची पोलिसांनी अलीकडे झाडाझडती सुरू केली असून गेल्या पंधरा दिवसांत सहाहून अधिक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
 
मुंबईत अलीकडच्या काळात स्पा आणि मसाज सेंटरची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक सेंटरमध्ये महिला आणि पुरूषांना परवानगी असल्याने याचा पुरेपूर फायदा दलाल घेत असतात. त्यामुळे डान्सबार, ठिकठिकाणी खुलेआम होणारे देहविक्री व्यवसाय, यानंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा स्पा आणि मसाज सेंटरकडे वळविला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून या सेंटरची तपासणी केली जात असून गेल्या पंधरा दिवसांत सहा ते सात नामांकित स्पा आणि मसाज सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमधून शरीरविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या २८ मुलींची सुटका करण्यात आली. स्पा मालक, मॅनेजर, दलाल, कर्मचारी यांच्यावर मानवी तस्करी, स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्पा मालक आपली जाहिरात करण्यासाठी वृत्तपत्र, वेबसाइटबरोबर सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत. अनेक सवलती, मुलींकडून मसाजचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. त्यामुळे या सेंटरमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमालीची वाढली आहे.
 
मुंबईमधील अतिशय हाय प्रोफाईल परिसर म्हाणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोव्यात अशाच प्रकारे सेक्सश रॅकेट सुरू होते. या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यातही पोलिसांना यश आले आहे. म्हाडा कॉलनीत हे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी २२ मुलींना ताब्यात घेण्यात आलं असून १५ दलालांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली. त्यादिवशी रात्री दीड वाजण्याच्याा सुमारास पोलिसांनी एका फ्लॅटवर धाड टाकली. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या समाजसेवा शाखेला या गोष्टीची माहिती मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री पटल्यानंतरच पोलिसांनी धाड टाकली. अटक करण्यायत आलेल्या दलालांकडून मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या इतर सेक्स रॅकेटचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यािमुळे पोलिसांचे हे धाडसत्र सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 

 
 
 
बऱ्याचदा स्पा आणि मसाज चालवणारे लोक आपल्या व्यवसायाची जाहिरात व्हावी, यासाठी अभिनेते आणि अभिनेत्रींना त्याच्या उद्घाटनासाठी बोलवत असतात. विलेपार्ले येथेही अशाच एका स्पा आणि मसाज पार्लरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनच्या हस्ते २००८ साली करण्यात आले होते. रविना टंडनने उद्घाटन केलेले असल्यामुळे उच्चभ्रू वर्गातील बरेच लोक याठिकाणी भेट देत असत. मात्र या स्पामध्ये सेक्स रॅकेटही चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या स्पावर छापा टाकून तेथे चालणारे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. ‘द थाय विला’ या नावाने हे स्पा सेंटर सुरू होते. पोलिसांनी छापा टाकून तेथून सहा मुलींची सुटका केली. विशेष म्हणजे सर्व मुली थायलंडच्या आहेत. देहव्यापारासाठी त्यांना बळजबरीने भारतात आणले गेल्याची माहिती समोर आली आहे.
 
विलेपार्ले पश्चिममधील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या दीक्षित रोडवरील ऋषी बिल्डिंगमध्ये या स्पामधील बेकायदेशील धंद्यांबद्दल पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात स्पाचा मालक शौरा खान आणि सुमित सिंघानिया या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कोरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, मुख्य हवलदार गावकर, शिंदे, पोलीस नाईक पेडणेकर, राऊत, पाटील, पोलीस हवलदार महांगडे, महिला पोलीस हवालदार लाड आणि पोलीस अधिकारी निकम या नऊ जणांनी रात्रीच्या वेळी या स्पावर धाड टाकली. त्यावेळी येथे स्पाचे दोन्ही मालक आणि व्यवस्थापक शरीरविक्रय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. तसेच येथून १ लाख २३ हजार रोख रक्कम, एक लॅपटॉप, एक कार्ड स्वाइप मशीन, तीन बिलबुक्स आणि ‘द थाय विला’संदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी सुटका केलेल्या सर्व सहा मुलींना थायलंडमधून पर्यटक व्हिसावर भारतात आणले गेले होते. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या सर्व गोष्टी विलेपार्ले पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
 
‘मुंबई नगरी बडी बांका..’ अशी एक म्हण आहे. येथे कुणीही उपाशी मरू शकत नाही, असेही म्हटले जाते. मुंबईचा झगमगाट वगैरेचे आकर्षण अनेकांना असते. त्यातून कलाकार बनण्याचे स्वप्न घेऊन, बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी म्हणून अनेक तरूण-तरूणी येत असतात. मात्र सर्वांनाच कामे मिळतात असे नाही. मग जीवन जगण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी यातील काही आर्टिस्टना नको त्या तडजोडी कराव्या लागतात. मुंबईतील सेक्स रॅकेटच्या भंडाफोड प्रकरणात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अशाच काही ज्युनियर आर्टिस्टचाही समावेश असल्याचे आढळून आले. मुंबई पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून तीन महिला एजंटना अटक केली. सेक्स रॅकेट चालवणारी महिला एजंट श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करायची. महिला एजंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉडेल्स आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा वापर करायची. महिला एजंटने ज्युनिअर आर्टिस्टला बॉलिवूडमध्ये सप्लाय करण्याची बातमीही पुढे आलीय.
पोलिसांनी ह्युमन ट्रॅफिकिंगविरोधी शाखेसोबत मिळून मीरा रोड इथे छापा टाकला. या दरम्यान पोलिसांनी तीन महिलांना अटक केली. या महिला एकाहून एक बॉलिवूडच्या ज्युनिअर आर्टिस्टसाठी एजंट म्हणून काम करत होत्या. पोलिसांनी एजंटजवळून ३ हजार रूपयेही जप्त केले. आरोपींमधील एक भाईंदरमध्ये राहणारी यास्मीन शेख आणि दुसरी नायगावला राहणारी प्रज्ञा सावे अशी त्यांची नावे आहेत. तिसरी महिला एजंट मीरा रोडवर राहणारी रूबीना शेख असे सांगण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आणखी आठ ज्युनिअर महिला कलाकारांनाही त्यांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार ज्युनिअर आर्टिस्टचं वय २०-२६ वर्षे आहे आणि या ग्राहकांकडून एका दिवसात २० ते ५० हजार रूपये घ्यायच्या. त्यांच्यावर कोणाचा संशय होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणीच त्या ग्राहकांसोबत डील करायच्या. पोलीस रूबिनाकडून तिच्या बॉलिवूड रिलेशनबद्दल चौकशी करत आहेत.
 
 
एकीकडे मुंबईतील स्पा आणि मसाज सेंटरमध्ये छुप्या पद्धतीने सेक्स रॅकेट चालवली जात असल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उघडपणे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचेही दिसून आले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर असलेल्या सेल्फी ढाब्यावर चाललेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी अलीकडेच पर्दाफाश केला आहे. याठिकाणी परराज्यातील मुली आणून सेक्स रॅकेट चालवले जात होते. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांचे गुन्हे पथक आणि वालीव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.
 
 
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सेल्फी ढाबा असून या ढाब्याच्या दर्शनीय भागावरच चक्क खुलेआम तेथील रूमचा दर लिहिला होता. फक्त ६०० रूपयात एक तास असे लिहून ठेवले होते. गंभीर म्हणजे अनैतिक संबंध असणाऱ्या जोडप्यांना याठिकाणी सर्रास रूम दिल्या जात होत्या. मुंबई आणि आजूबाजूच्या आंबट शौकिनांसाठी हाय-प्रोफाईल १८ ते २५ वर्षे वयोगटातील मुलीही पुरविल्या जात होत्या. या कारवाईत पोलिसांच्या ताब्यात चार पीडित मुली मिळून आल्या. या चारही मुली २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. अशा मुलींकडून याठिकाणी पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेतला जात होता.
  
पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वालीव पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करून या ढाब्यावर छापा मारला व तेथील पीडित मुलींची सुटका केली. या छाप्यात मिळालेल्या चार पीडित मुलींपैकी एक बांग्लादेशी, एक कलकत्त्याची आणि दोन इतर राज्यांतील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, एक दलाल आणि इतर सहा असे आठ आरोपीही ताब्यात घेतले.
 
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक मोठमोठी हॉटेल आणि ढाबे आहेत. सेल्फी ढाबा मालकाने तर चक्क रूमचा एक तासांचा दर दर्शनीय ठिकाणी लावून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू केला होता. याठिकाणी एकूण १७ रूम आहेत. त्याठिकाणी कोणतेही ओळखपत्र न घेता सर्रास रूम दिल्या जात असल्याचे तपासांत उघड झाले आहे. तर छाप्यात पोलिसांना मिळून आलेल्या बांग्लादेशी, कोलकाता येथील पीडित मुली वसईत कशा व कुठून आणल्या जात होत्या, तसेच आणखी यात कोण सामील आहे, याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, सद्यस्थितीत महामार्ग सेक्स रॅकेटचा अड्डा बनले आहे हेही तितकेच सत्य आहे.”

 
 

 
 
 
“जगदीश भोवड, ज्येष्ठ पत्रकार”
Jagdish.bhovad@gmail.com

 
“मागील पंधरा दिवसांत आलेल्या या बातम्यांनी मुंबईसारख्या औद्योगिक आणि आर्थिक राजधानीमध्ये खळबळ माजवली आहे. मुंबईत नेमके काय सुरू आहे, सरकारने कितीही कायदे केले, तरीही पैशांच्या हव्यासाने विविध क्लृप्त्या लढवणारे लढवणारच हेच यातून दिसून येत आहे. तरूण पिढी बरबाद होते, म्हणून मध्यंतरी सरकारने कडक कायदे केले. डान्सबारवर बंदी घातली. त्यानंतर डान्सबार तसेच खुलेआम देहव्रिकय व्यवसाय चालविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. त्यानंतर या व्यवसायातील दलालांची आर्थिक कमाई बंद झाली. मात्र त्यातूनही काहीतरी मार्ग काढीत या महाभागांनी चक्क स्पा आणि मसाज सेंटरचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे.”

“मुंबईमध्ये, विशेषकरून उच्चभ्रू वस्तींमध्ये स्पा आणि मसाज सेंटरचा अलीकडच्या काळात सुळसुळाट झालेला आहे. या स्पा आणि मसाज सेंटरमध्ये बहुतांशी बारबालांना कामाला ठेवण्यात येऊ लागले असून त्यांच्याकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अशाच स्पा आणि मसाज सेंटरची पोलिसांनी अलीकडे झाडाझडती सुरू केली असून गेल्या पंधरा दिवसांत सहाहून अधिक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.”
 

“मुंबईत अलीकडच्या काळात स्पा आणि मसाज सेंटरची संख्या प्रचंड वाढली आहे. अनेक सेंटरमध्ये महिला आणि पुरूषांना परवानगी असल्याने याचा पुरेपूर फायदा दलाल घेत असतात. त्यामुळे डान्सबार, ठिकठिकाणी खुलेआम होणारे देहविक्री व्यवसाय, यानंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा स्पा आणि मसाज सेंटरकडे वळविला आहे. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांकडून या सेंटरची तपासणी केली जात असून गेल्या पंधरा दिवसांत सहा ते सात नामांकित स्पा आणि मसाज सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमधून शरीरविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आलेल्या २८ मुलींची सुटका करण्यात आली. स्पा मालक, मॅनेजर, दलाल, कर्मचारी यांच्यावर मानवी तस्करी, स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्पा मालक आपली जाहिरात करण्यासाठी वृत्तपत्र, वेबसाइटबरोबर सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत. अनेक सवलती, मुलींकडून मसाजचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. त्यामुळे या सेंटरमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमालीची वाढली आहे.”
 

मुंबईमधील अतिशय हाय प्रोफाईल परिसर म्हाणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोव्यात अशाच प्रकारे सेक्सश रॅकेट सुरू होते. या सेक्स रॅकेटचा भंडाफोड करण्यातही पोलिसांना यश आले आहे. म्हाडा कॉलनीत हे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी २२ मुलींना ताब्यात घेण्यात आलं असून १५ दलालांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली. त्यादिवशी रात्री दीड वाजण्याच्याा सुमारास पोलिसांनी एका फ्लॅटवर धाड टाकली. काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या समाजसेवा शाखेला या गोष्टीची माहिती मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री पटल्यानंतरच पोलिसांनी धाड टाकली. अटक करण्यायत आलेल्या दलालांकडून मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या इतर सेक्स रॅकेटचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यािमुळे पोलिसांचे हे धाडसत्र सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 

 
 
 
“बऱ्याचदा स्पा आणि मसाज चालवणारे लोक आपल्या व्यवसायाची जाहिरात व्हावी, यासाठी अभिनेते आणि अभिनेत्रींना त्याच्या उद्घाटनासाठी बोलवत असतात. विलेपार्ले येथेही अशाच एका स्पा आणि मसाज पार्लरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडनच्या हस्ते २००८ साली करण्यात आले होते. रविना टंडनने उद्घाटन केलेले असल्यामुळे उच्चभ्रू वर्गातील बरेच लोक याठिकाणी भेट देत असत. मात्र या स्पामध्ये सेक्स रॅकेटही चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या स्पावर छापा टाकून तेथे चालणारे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. ‘द थाय विला’ या नावाने हे स्पा सेंटर सुरू होते. पोलिसांनी छापा टाकून तेथून सहा मुलींची सुटका केली. विशेष म्हणजे सर्व मुली थायलंडच्या आहेत. देहव्यापारासाठी त्यांना बळजबरीने भारतात आणले गेल्याची माहिती समोर आली आहे.”
 

“विलेपार्ले पश्चिममधील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या दीक्षित रोडवरील ऋषी बिल्डिंगमध्ये या स्पामधील बेकायदेशील धंद्यांबद्दल पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात स्पाचा मालक शौरा खान आणि सुमित सिंघानिया या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कोरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, मुख्य हवलदार गावकर, शिंदे, पोलीस नाईक पेडणेकर, राऊत, पाटील, पोलीस हवलदार महांगडे, महिला पोलीस हवालदार लाड आणि पोलीस अधिकारी निकम या नऊ जणांनी रात्रीच्या वेळी या स्पावर धाड टाकली. त्यावेळी येथे स्पाचे दोन्ही मालक आणि व्यवस्थापक शरीरविक्रय व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली. तसेच येथून १ लाख २३ हजार रोख रक्कम, एक लॅपटॉप, एक कार्ड स्वाइप मशीन, तीन बिलबुक्स आणि ‘द थाय विला’संदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली. पोलिसांनी सुटका केलेल्या सर्व सहा मुलींना थायलंडमधून पर्यटक व्हिसावर भारतात आणले गेले होते. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या सर्व गोष्टी विलेपार्ले पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्या.”
 

“‘मुंबई नगरी बडी बांका..’ अशी एक म्हण आहे. येथे कुणीही उपाशी मरू शकत नाही, असेही म्हटले जाते. मुंबईचा झगमगाट वगैरेचे आकर्षण अनेकांना असते. त्यातून कलाकार बनण्याचे स्वप्न घेऊन, बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी म्हणून अनेक तरूण-तरूणी येत असतात. मात्र सर्वांनाच कामे मिळतात असे नाही. मग जीवन जगण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी यातील काही आर्टिस्टना नको त्या तडजोडी कराव्या लागतात. मुंबईतील सेक्स रॅकेटच्या भंडाफोड प्रकरणात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अशाच काही ज्युनियर आर्टिस्टचाही समावेश असल्याचे आढळून आले. मुंबई पोलिसांनी हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून तीन महिला एजंटना अटक केली. सेक्स रॅकेट चालवणारी महिला एजंट श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करायची. महिला एजंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉडेल्स आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा वापर करायची. महिला एजंटने ज्युनिअर आर्टिस्टला बॉलिवूडमध्ये सप्लाय करण्याची बातमीही पुढे आलीय.”

“पोलिसांनी ह्युमन ट्रॅफिकिंगविरोधी शाखेसोबत मिळून मीरा रोड इथे छापा टाकला. या दरम्यान पोलिसांनी तीन महिलांना अटक केली. या महिला एकाहून एक बॉलिवूडच्या ज्युनिअर आर्टिस्टसाठी एजंट म्हणून काम करत होत्या. पोलिसांनी एजंटजवळून ३ हजार रूपयेही जप्त केले. आरोपींमधील एक भाईंदरमध्ये राहणारी यास्मीन शेख आणि दुसरी नायगावला राहणारी प्रज्ञा सावे अशी त्यांची नावे आहेत. तिसरी महिला एजंट मीरा रोडवर राहणारी रूबीना शेख असे सांगण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आणखी आठ ज्युनिअर महिला कलाकारांनाही त्यांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार ज्युनिअर आर्टिस्टचं वय २०-२६ वर्षे आहे आणि या ग्राहकांकडून एका दिवसात २० ते ५० हजार रूपये घ्यायच्या. त्यांच्यावर कोणाचा संशय होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणीच त्या ग्राहकांसोबत डील करायच्या. पोलीस रूबिनाकडून तिच्या बॉलिवूड रिलेशनबद्दल चौकशी करत आहेत.”
 
 
एकीकडे मुंबईतील स्पा आणि मसाज सेंटरमध्ये छुप्या पद्धतीने सेक्स रॅकेट चालवली जात असल्याचे आढळून आले आहे. त्याचवेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उघडपणे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचेही दिसून आले आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर असलेल्या सेल्फी ढाब्यावर चाललेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी अलीकडेच पर्दाफाश केला आहे. याठिकाणी परराज्यातील मुली आणून सेक्स रॅकेट चालवले जात होते. पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांचे गुन्हे पथक आणि वालीव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.
 
 
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सेल्फी ढाबा असून या ढाब्याच्या दर्शनीय भागावरच चक्क खुलेआम तेथील रूमचा दर लिहिला होता. फक्त ६०० रूपयात एक तास असे लिहून ठेवले होते. गंभीर म्हणजे अनैतिक संबंध असणाऱ्या जोडप्यांना याठिकाणी सर्रास रूम दिल्या जात होत्या. मुंबई आणि आजूबाजूच्या आंबट शौकिनांसाठी हाय-प्रोफाईल १८ ते २५ वर्षे वयोगटातील मुलीही पुरविल्या जात होत्या. या कारवाईत पोलिसांच्या ताब्यात चार पीडित मुली मिळून आल्या. या चारही मुली २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. अशा मुलींकडून याठिकाणी पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेतला जात होता.

  
“पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ गुन्हे प्रतिबंधक पथक आणि वालीव पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करून या ढाब्यावर छापा मारला व तेथील पीडित मुलींची सुटका केली. या छाप्यात मिळालेल्या चार पीडित मुलींपैकी एक बांग्लादेशी, एक कलकत्त्याची आणि दोन इतर राज्यांतील आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, एक दलाल आणि इतर सहा असे आठ आरोपीही ताब्यात घेतले.”
 

“मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अनेक मोठमोठी हॉटेल आणि ढाबे आहेत. सेल्फी ढाबा मालकाने तर चक्क रूमचा एक तासांचा दर दर्शनीय ठिकाणी लावून खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू केला होता. याठिकाणी एकूण १७ रूम आहेत. त्याठिकाणी कोणतेही ओळखपत्र न घेता सर्रास रूम दिल्या जात असल्याचे तपासांत उघड झाले आहे. तर छाप्यात पोलिसांना मिळून आलेल्या बांग्लादेशी, कोलकाता येथील पीडित मुली वसईत कशा व कुठून आणल्या जात होत्या, तसेच आणखी यात कोण सामील आहे, याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, सद्यस्थितीत महामार्ग सेक्स रॅकेटचा अड्डा बनले आहे हेही तितकेच सत्य आहे.”

Continue reading

नाशिकमध्ये झाला ग्लॅमर आणि सांस्कृतिक वारशाचा मिलाफ!

महाराष्ट्राच्या सुवर्ण परंपरेचा वारसा जपणाऱ्या पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजीजेएल)ने आपल्या विस्ताराचा अश्वमेध सुरूच ठेवला असून, मुंबईसह आता नाशिकमध्ये आपले नवीन भव्य दालन सुरू केले आहे. नाशिकच्या वाढत्या बाजारपेठेची गरज आणि ग्राहकांचा वाढता ओढा लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल...

तीन-चार महिन्यांनंतर वाढणार साखरेची ‘गोडी’!

जागतिक बाजारात सध्या साखरेच्या दराबाबत मोठी खळबळ उडाली आहे. 2026च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) साखरेचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. याला केवळ मागणी कारणीभूत नसून, त्यामागे पॅसिफिक महासागरातील हवामान बदल, ऊर्जेची भूक आणि...

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...
Skip to content