HomeArchiveराज ठाकरे शांत...

राज ठाकरे शांत का?

Details
राज ठाकरे शांत का?

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
विनोद साळवी..
 
 
 
साहेब, आता तरी इंजिन चालवा, अशी आर्जव करणार्या मनसैनिकांना राज मास्तरांकडून उत्साह, हुरूप आणि ऊर्जा वाढवणार्यां उत्तराची अपेक्षा आहे. कोहिनूर प्रकरणात ईडीकडून चौकशी झाल्यानंतर, ‘माझा आवाज कुणीच बंद करू शकत नाही’ असं भाजप सरकारला ठणकावून सांगणार्याा राज ठाकरे यांचा आवाज एकाएकी बंद कसा झाला? लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आणि पत्रकार असं दुहेरी काम करणार्याब राज ठाकरेंचा ‘लावरे तो व्हीडिओ’ आजही सत्ताधाऱ्यांना दिसला की धस्स होतं. परंतु, लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी असमर्थता दाखवणार्यां राज यांचं इंजिन विधानसभा तोंडावर आल्यानंतरही थंडच पडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झुलत्या पुलावरून एकामागोमाग एक, अनेक ‘सत्ताप्रेमी’ भाजप-शिवसेनेच्या गळाला लागत गेले. त्यातही राज ठाकरेंची मनसे न फुटता तग धरून राहिली. सत्तेपेक्षा विरोधकांच्या भूमिकेत जन की बात मांडू, ही मनसैनिकांची आशा काही फलद्रुप होताना दिसत नाही.
 
 
साहेब, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. तुम्ही फक्त आदेश द्या, अशी साद घालून राज शांतचित्त आहेत. साहेबांना एकाएकी असं काय झालं, आरेला का रे करणारे राज ठाकरे, असे कोणत्या विचारात, संकटात पडले आहेत? २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशातून ते अजूनही बाहेर पडले नाहीत का? मराठी माणूस, परप्रांतीयांचे वाढते लोंढे, आर्थिक मंदी, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आजही त्यांच्यासमोर असताना ते शांत का? पक्ष अथवा संघटना कोणतीही असो तिला सतत कार्यक्रम लागतो. कार्यकर्ता कायम व्यस्त ठेवावा लागतो. टोलमाफी असो अथवा मराठीचा कैवार असो, आजही राज ठाकरेंच्या मनसेची दहशत महाराष्ट्रभरात आहे. काही राजकीय धुरिणांच्या मते राज ठाकरेंच्या मनसेला उभारी घेण्यासाठी ही शेवटची संधी आहे. पुणे, नाशिक, खेड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील तरूण आणि उमदा कार्यकर्ता ही आजही मनसेची ताकद आहे. राज ठाकरेंचं वाक्चातुर्य आणि सडेतोडपणा त्याला भुरळ घालतो. सामान्य माणसांच्या मन की बात करून नेमक्या मुद्द्यांना हात घालण्याचं कसब राजमास्तरांकडे आहे. त्यांच्या विश्वासातले आमदार, नगरसेवक एकामागोमाग एक, त्यांची साथ सोडून गेले. मनसेचं इंजिन आता यार्डात लागल्याचं राजकीय विश्लेषणही करून झालं. परंतु, त्यानंतरही शांत आणि संयमी राजकारण खेळणारे राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांपेक्षा कायम चर्चेत राहिले.
 
 

 
 
 
विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेल्या आग्रही भूमिकेची दखल पाकिस्तानी वाहिन्यांनाही घ्यावी लागली. टीआरपी आणि एमआरपी या दोन्ही बाबतीत राज ठाकरे आजही उजवे आहेत. राज हे हरलेले आणि सर्व काही हरवून बसलेले सेनापती आहेत, त्यांना लोक मनोरंजन म्हणून ऐकतात. सिरियसली घेत नाहीत, असा कयासही लावला जातो. पण, याच राज यांच्या मनोरंजनावर टीव्ही चॅनलवाल्यांना खाद्य अन् दिवसभर दळायला दळण मिळते. त्याहीउपर मनसे आमच्या गणतीत नाही, असं मोजणारी शिवसेना-भाजप मनसेला मोठा ताप मानते. राज ठाकरेंच्या एका शब्दानेही बिथरते, हे वास्तव आहे. ज्या माणसाचा करिष्मा ओसरला आहे, असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी त्याचीच सर्वाधिक भीती का बरं वाटावी? शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख होतो. परंतु, सत्ता नसेल तर ‘जल बिन मछली अन् नृत्य बिन बिजली’ अशी अवस्था नसलेल्या नेत्यांत राज ठाकरे नाहीत, हेही मान्य करावं लागेल. ९ मार्च २००६ रोजी स्थापन झालेल्या राज ठाकरेंच्या मनसेचा अपवाद वगळता समता परिषद, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून आपला सवतासुभा उभा करणार्याि राणे व भुजबळांनाही संघटन वाढवणं जमलं नाही. शिवसेनेचा मराठी बाणा अंगी बाणवणार्याव मनसैनिकांनी तो निष्ठेने जोपासला. अगदी गुजराती, युपी, बिहारी मतांसाठी मनसेची राजकीय मांडवली दिसली नाही. ती मनसे आणि तो सैनिक आजही एकट्या पडलेल्या राजाला साथ देण्यासाठी, गड लढवण्यासाठी सज्ज आहे. सत्तेच्या मोहमायेला बळी न पडता तो आजही मनाने राजासोबतच आहे. परंतु, राजाची शांतता या कार्यकर्त्याला आता अस्वस्थ करत आहे.”

 
 
 
विनोद साळवी..
 
 
 
“साहेब, आता तरी इंजिन चालवा, अशी आर्जव करणार्या मनसैनिकांना राज मास्तरांकडून उत्साह, हुरूप आणि ऊर्जा वाढवणार्यां उत्तराची अपेक्षा आहे. कोहिनूर प्रकरणात ईडीकडून चौकशी झाल्यानंतर, ‘माझा आवाज कुणीच बंद करू शकत नाही’ असं भाजप सरकारला ठणकावून सांगणार्याा राज ठाकरे यांचा आवाज एकाएकी बंद कसा झाला? लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष आणि पत्रकार असं दुहेरी काम करणार्याब राज ठाकरेंचा ‘लावरे तो व्हीडिओ’ आजही सत्ताधाऱ्यांना दिसला की धस्स होतं. परंतु, लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी असमर्थता दाखवणार्यां राज यांचं इंजिन विधानसभा तोंडावर आल्यानंतरही थंडच पडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या झुलत्या पुलावरून एकामागोमाग एक, अनेक ‘सत्ताप्रेमी’ भाजप-शिवसेनेच्या गळाला लागत गेले. त्यातही राज ठाकरेंची मनसे न फुटता तग धरून राहिली. सत्तेपेक्षा विरोधकांच्या भूमिकेत जन की बात मांडू, ही मनसैनिकांची आशा काही फलद्रुप होताना दिसत नाही.”
 
 
“साहेब, आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत. तुम्ही फक्त आदेश द्या, अशी साद घालून राज शांतचित्त आहेत. साहेबांना एकाएकी असं काय झालं, आरेला का रे करणारे राज ठाकरे, असे कोणत्या विचारात, संकटात पडले आहेत? २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशातून ते अजूनही बाहेर पडले नाहीत का? मराठी माणूस, परप्रांतीयांचे वाढते लोंढे, आर्थिक मंदी, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आजही त्यांच्यासमोर असताना ते शांत का? पक्ष अथवा संघटना कोणतीही असो तिला सतत कार्यक्रम लागतो. कार्यकर्ता कायम व्यस्त ठेवावा लागतो. टोलमाफी असो अथवा मराठीचा कैवार असो, आजही राज ठाकरेंच्या मनसेची दहशत महाराष्ट्रभरात आहे. काही राजकीय धुरिणांच्या मते राज ठाकरेंच्या मनसेला उभारी घेण्यासाठी ही शेवटची संधी आहे. पुणे, नाशिक, खेड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील तरूण आणि उमदा कार्यकर्ता ही आजही मनसेची ताकद आहे. राज ठाकरेंचं वाक्चातुर्य आणि सडेतोडपणा त्याला भुरळ घालतो. सामान्य माणसांच्या मन की बात करून नेमक्या मुद्द्यांना हात घालण्याचं कसब राजमास्तरांकडे आहे. त्यांच्या विश्वासातले आमदार, नगरसेवक एकामागोमाग एक, त्यांची साथ सोडून गेले. मनसेचं इंजिन आता यार्डात लागल्याचं राजकीय विश्लेषणही करून झालं. परंतु, त्यानंतरही शांत आणि संयमी राजकारण खेळणारे राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांपेक्षा कायम चर्चेत राहिले.”
 
 

 
 
 
“विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर राज ठाकरेंनी घेतलेल्या आग्रही भूमिकेची दखल पाकिस्तानी वाहिन्यांनाही घ्यावी लागली. टीआरपी आणि एमआरपी या दोन्ही बाबतीत राज ठाकरे आजही उजवे आहेत. राज हे हरलेले आणि सर्व काही हरवून बसलेले सेनापती आहेत, त्यांना लोक मनोरंजन म्हणून ऐकतात. सिरियसली घेत नाहीत, असा कयासही लावला जातो. पण, याच राज यांच्या मनोरंजनावर टीव्ही चॅनलवाल्यांना खाद्य अन् दिवसभर दळायला दळण मिळते. त्याहीउपर मनसे आमच्या गणतीत नाही, असं मोजणारी शिवसेना-भाजप मनसेला मोठा ताप मानते. राज ठाकरेंच्या एका शब्दानेही बिथरते, हे वास्तव आहे. ज्या माणसाचा करिष्मा ओसरला आहे, असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी त्याचीच सर्वाधिक भीती का बरं वाटावी? शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख होतो. परंतु, सत्ता नसेल तर ‘जल बिन मछली अन् नृत्य बिन बिजली’ अशी अवस्था नसलेल्या नेत्यांत राज ठाकरे नाहीत, हेही मान्य करावं लागेल. ९ मार्च २००६ रोजी स्थापन झालेल्या राज ठाकरेंच्या मनसेचा अपवाद वगळता समता परिषद, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून आपला सवतासुभा उभा करणार्याि राणे व भुजबळांनाही संघटन वाढवणं जमलं नाही. शिवसेनेचा मराठी बाणा अंगी बाणवणार्याव मनसैनिकांनी तो निष्ठेने जोपासला. अगदी गुजराती, युपी, बिहारी मतांसाठी मनसेची राजकीय मांडवली दिसली नाही. ती मनसे आणि तो सैनिक आजही एकट्या पडलेल्या राजाला साथ देण्यासाठी, गड लढवण्यासाठी सज्ज आहे. सत्तेच्या मोहमायेला बळी न पडता तो आजही मनाने राजासोबतच आहे. परंतु, राजाची शांतता या कार्यकर्त्याला आता अस्वस्थ करत आहे.”

Continue reading

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...

आज हनुमान जयंती! जाणून घ्या मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र!! 

आज हनुमान (मारुती) जयंती! मनोजवम् मारुततुल्यवेगञ्, जितेन्द्रियम् बुद्धिमतां वरिष्ठम्।। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणम् प्रपद्ये।। अर्थात् मनोवेगाने जाणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, जितेंद्रिय, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपती आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे. मारुतीच्या अतुलनीय गुणवैशिष्ट्यांची ओळख या एका श्लोकावरून होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जवळचा वाटणारा...
Skip to content