HomeArchiveपीएमसी बँकेत केंद्राच्या...

पीएमसी बँकेत केंद्राच्या हस्तक्षेपाची गरज!

Details
पीएमसी बँकेत केंद्राच्या हस्तक्षेपाची गरज!

    26-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
वैभव मोहन पाटील..
vaibhavpatil2k5@yahoo.com 
 
 
मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आणि मुंबईसह इतर भागांतील पीएमसीच्या बँक शाखांमध्ये एकच गदारोळ झाला. बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत तर खातेदार केवळ एक हजार रूपये इतकीच रक्कम बँकेतून काढू शकणार आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते, असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले असले तरी त्यात या बँकेच्या ग्राहकांच्या हिताबाबत कोणताही निर्णय नसल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. २३ सप्टेंबरपासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, नव्या ठेवी स्वीकारू नयेत, त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये, असे असे आदेश देण्यात आलेले आहेत.
 
 
पीएमसी या बँकेच्या शेकडो शाखा विविध ठिकाणी कार्यरत असून त्यामध्ये लाखो ठेवीदारांच्या गुंतवणुका विविध माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या ह्या बँकेचे बहुतांशी सभासद नोकरदार, छोटे व्यावसायिक, दुकानदार, गृहिणी, कष्टकरी असेच आहेत. त्यांची आयुष्यभराची पुंजी सणासुदीच्या काळात बँकेत अडकून पडल्याने मंगळवारी संतापाचा कडेलोट पाहयला मिळाला. बँकेबाहेर लागलेल्या रांगा तर नोटबंदीची आठवण करून देणाऱ्याच होत्या. निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रूपयेच काढता येणार असल्यामुळे आता गृहकर्ज, वाहनकर्ज यासह इतर कर्जाचे हप्ते कसे भरायचे तसेच दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न खातेदारांना पडला आहे.
 
 

 
 

ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने बँकेच्या उद्द्येशाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, वीज बिल, प्रिंटिंग व स्टेशनरी, पत्रव्यवहार, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येण्यासाठी दिलेली मुभा, संतापात अधिकच भर घालणारी आहे. सभासदांच्या ठेवीतून बँकेचे सर्व व्यवहार सुरू ठेवण्यासाठी सवलत दिली जाते. मात्र, ठेवीदारांना त्यांचा स्वतःचा पैसा काढता येणार नाही ही बाब अनाकलनीय आहे. पीएमसीने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात असले तरी ही बाब काही एका रात्रीत घडलेली नाही. वेळच्या वेळी बँकेच्या झालेल्या ऑडिटमधून ही अनियमितता समोर यायला हवी होती. मात्र तडकाफडकी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणून सभासदांना आपल्या ठेवी काढण्याची संधी न देणे म्हणजे बँकेच्या ग्राहकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या हक्काची व कष्टाची मिळकत या बँकेतून त्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आता मध्यस्थीची भूमिका पार पाडावी. बँकेतील आर्थिक अनियमिततेला जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करावीच. मात्र, सर्वसामान्य यात भरडले जाऊ नयेत एव्हढीच अपेक्षा!”

 

 
 
वैभव मोहन पाटील..
vaibhavpatil2k5@yahoo.com 
 
 
“मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आणि मुंबईसह इतर भागांतील पीएमसीच्या बँक शाखांमध्ये एकच गदारोळ झाला. बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आलेले आहेत तर खातेदार केवळ एक हजार रूपये इतकीच रक्कम बँकेतून काढू शकणार आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणणे गरजेचे होते, असे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात म्हटले असले तरी त्यात या बँकेच्या ग्राहकांच्या हिताबाबत कोणताही निर्णय नसल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. २३ सप्टेंबरपासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, नव्या ठेवी स्वीकारू नयेत, त्याचबरोबर बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नये, असे असे आदेश देण्यात आलेले आहेत.”
 
 
“पीएमसी या बँकेच्या शेकडो शाखा विविध ठिकाणी कार्यरत असून त्यामध्ये लाखो ठेवीदारांच्या गुंतवणुका विविध माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या ह्या बँकेचे बहुतांशी सभासद नोकरदार, छोटे व्यावसायिक, दुकानदार, गृहिणी, कष्टकरी असेच आहेत. त्यांची आयुष्यभराची पुंजी सणासुदीच्या काळात बँकेत अडकून पडल्याने मंगळवारी संतापाचा कडेलोट पाहयला मिळाला. बँकेबाहेर लागलेल्या रांगा तर नोटबंदीची आठवण करून देणाऱ्याच होत्या. निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रूपयेच काढता येणार असल्यामुळे आता गृहकर्ज, वाहनकर्ज यासह इतर कर्जाचे हप्ते कसे भरायचे तसेच दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न खातेदारांना पडला आहे.”
 
 

 
 

“ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने बँकेच्या उद्द्येशाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, वीज बिल, प्रिंटिंग व स्टेशनरी, पत्रव्यवहार, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येण्यासाठी दिलेली मुभा, संतापात अधिकच भर घालणारी आहे. सभासदांच्या ठेवीतून बँकेचे सर्व व्यवहार सुरू ठेवण्यासाठी सवलत दिली जाते. मात्र, ठेवीदारांना त्यांचा स्वतःचा पैसा काढता येणार नाही ही बाब अनाकलनीय आहे. पीएमसीने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात असले तरी ही बाब काही एका रात्रीत घडलेली नाही. वेळच्या वेळी बँकेच्या झालेल्या ऑडिटमधून ही अनियमितता समोर यायला हवी होती. मात्र तडकाफडकी बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणून सभासदांना आपल्या ठेवी काढण्याची संधी न देणे म्हणजे बँकेच्या ग्राहकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या हक्काची व कष्टाची मिळकत या बँकेतून त्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आता मध्यस्थीची भूमिका पार पाडावी. बँकेतील आर्थिक अनियमिततेला जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करावीच. मात्र, सर्वसामान्य यात भरडले जाऊ नयेत एव्हढीच अपेक्षा!”

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानोटबंदीगृहकर्जवाहनकर्जपंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक

Continue reading

रविवारी आनंद घ्या भारती प्रताप यांच्या गायनाचा 

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात, येत्या रविवारी, ५ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारती प्रताप यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीकृष्ण जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी...

आजपासून ‘क्रेडिट स्कोअर’ होणार दर आठवड्याला अपडेट!

बुधवार, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (२०२६-२७) सुरू होत असून, रिझर्व्ह बँकेने क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (सीआयसी'ज) जसे की, सिबिल, एक्स्पेरियन, इक्विफॅक्स आणि हाय मार्क यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज घेण्याच्या प्रक्रियेवर...

आखातातल्या गुगल, एप्पल आदी १८ कंपन्यांवर आजपासून इराणचे हल्ले

इराणविरूद्ध अमेरिका आणि इस्त्रायलच्या युद्धात सहभागी होण्यास युरोपातल्या बहुतांश सर्व देशांनी (नाटो संघटनेत असलेल्या) स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे. पोलंड, हंगेरी, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, स्लोव्हाकिया, इटली आदी देशांचा यात समावेश आहे. ब्रिटनने या संघर्षात अमेरिकेला अत्यंत मर्यादित...
Skip to content